बांधावरील पोल काढल्याच्या कारणावरून शेतकऱ्यास बेदम मारहाण तीन जणाविरुद्ध गुन्हा दाखल-Tuljapur Police Station Crime News

Hot Posts

6/recent/ticker-posts

बांधावरील पोल काढल्याच्या कारणावरून शेतकऱ्यास बेदम मारहाण तीन जणाविरुद्ध गुन्हा दाखल-Tuljapur Police Station Crime News

बांधावरील पोल काढल्याच्या कारणावरून शेतकऱ्यास बेदम मारहाण तीन जणाविरुद्ध गुन्हा दाखल-


 तुळजापूर : तालुक्यातील  आपशिंगा शिवारात बांधावरील पोल काढून तो आमच्या शेतात का लावला या कारणावरून एक जणास तीन जणांनी मिळून बेदम मारहाण केल्याचे घटना दि, 4 रोजी घडली आहे .याप्रकरणी फिर्यादी हनुमंत डुकरे यांच्या तक्रारीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात (Police station)तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ,आरोपी  नामे-नाराया निवृत्ती काळे, शंभु नारायण काळे, सुष्मा नारायण काळे सर्व रा. अपसिंगा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.04.12.2025 रोजी 07.45 वा. सु. कात्री अपसिंगा रोडवर फिर्यादी नामे-हनुमंत नामदेव डुकरे, वय 42 वर्षे, रा. अपसिंगा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी बांधावरील पोल काढून तो आमच्या शेतात का रोवला या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, तलवारीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. फिर्यादी यांचे भाउ प्रकाश नामदेव डुकरे यांनाही  डाव्या हातावर मारुन जखमी केले. फिर्यादीचे आईस ढकलून दिले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. मजकुराच्या फिर्यादी नामे-हनुमंत डुकरे यांनी दि.10.12.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे तुळजापूर येथे भा.न्या.सं.कलम 118(2),118(1), 115(2), 352,351(2), (3),3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments