शेतात जनावरांना चारा-पाणी करण्यासाठी गेलेल्या एका २२ वर्षीय तरुणीवर लैंगीक अत्याचार तरुणावर गुन्हा दाखल धाराशिव जिल्ह्यातील घटना -
धाराशिव/प्रतिनिधी रूपेश डोलारे : परंडा तालुक्यातील एका गावात शेतात जनावरांना चारा पाणी करण्यासाठी गेलेल्या एका बावीस वर्षीय तरुणीवर गावातीलच एका तरुणाने बळजबरीने लैंगिक अत्याचार करून शिवीगाळ करत धमकी दिल्याची धक्कादायक घटना दि,२२ रोजी घडली आहे .पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून नमूद तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे गाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे .
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की परंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील 22 वर्ष मुलगी (नाव- गावगोपनीय) दि.22.12.2025 रोजी 17.00 वा. सु. हि शेतात जनावरांना चारा पाणी करण्यासाठी गेली असता गावातील एका तरुणाने तिचे शेतात येवून तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. शिवीगाळ करुन तुला कोठे जायचे आहे तेथे जा अशी धमकी दिली.अशा मजकुराच्या पिडीतेने दि.22.12.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-64(1),352, 351 (2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा एक तपास परंडा पोलीस करत आहेत.

0 Comments