नोकरीचे आमीष दाखवुन शिक्षकेवर तीन वर्षापासून लैंगिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरलचीही धमकी चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल बीड जिल्ह्यातील घटना -
बीड : नोकरीचे आमिष दाखवून एका 28 वर्षीय सहशिक्षकेवर गेल्या तीन वर्षापासून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई तालुक्यात उघडकीस आली आहे .या प्रकरणानंतर पीडीतेच्या पतीलाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी एकाच कुटुंबातील चौघात जनाविरुद्ध गंभीर कलमान्वे गुन्हा दाखल केला आहे या घटनेमुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार पीडित महिला एका शाळेत सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत मुख्य आरोपी मोहीम बासर शेख यांनी पीडितेस नोकरीची आमीष दाखवून गेल्या तीन वर्षापासून तिचे शारीरिक शोषण केले .माझ्याशी शरीर संबंध ठेव नाही तर तुझे नको त्या अवस्थेतील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी देतो सतत तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता .पिडीतिच्या वतीने या प्रकाराबाबत विचारणा केली असता मोहीम शेख यांच्यासह त्याचे भाऊ बाबा शेख, इरशाद शेख आणि मोसिन शेख यांनी संगणमत करून पिडीतेच्या पतीला शिवीगाळ केली तसेच यापुढे विचारणा केली तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली .अखेर पिडीतीने शुक्रवार दिनांक 30 रोजी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय समितीच्या कलम 64 बलात्कार 69( फसवणूक करून शारीरिक संबंध) 352, 351 (2) आणि 3,4 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव करत आहेत.

0 Comments