/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> सोलापूर : पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापास २० वर्षे सक्त मजुरी व दंडाची शिक्षा ;विशेष सत्र न्यायालयाचा निकाल-Solapur Session Court Judgement

Hot Posts

सोलापूर : पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापास २० वर्षे सक्त मजुरी व दंडाची शिक्षा ;विशेष सत्र न्यायालयाचा निकाल-Solapur Session Court Judgement

सोलापूर : पोटच्या  अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापास २० वर्षे सक्त मजुरी व दंडाची शिक्षा ;विशेष सत्र न्यायालयाचा निकाल-


सोलापुर: पोटच्या  अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापास विशेष न्यायाधीश बी .एन सुरवसे यांनी २० वर्षे सक्त मजूर व 20000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या घटनेची हकीगत थोडक्यात अशी की यातील पिडीत ही अल्पवयीन असून 15 जानेवारी 2020 रोजी घरी असताना नराधम  पित्याने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्या नराधम  बापाने पिडीतेला घडलेली घटना कोणालाही न सांगण्याची तंबी केली होती त्यानंतर दोन-तीन दिवसानंतर पिडीतीची बहीण ही घराबाहेर गेली असता त्या नराधम बापाने पुन्हा पिडीतेवर  अत्याचार केला .असा प्रकार त्या नराधम बापाने वारंवार पिडीती सोबत केला एके दिवशी पिडीतेच्या बहिणीने हा प्रकार पाहिला आणि तिच्या आईला सांगितला त्यावरून सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात नराधम  बापविरुद्ध बालक लैंगिक अत्याचाराच्या कलमासह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सहाय्यक पोलीस निरीक्षक देवडे यांनी आरोपी नराधम बापास अटक करून तपास केला व न्यायालयात दोषारोपपत्र पाठवले या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश बी एन सुरवसे यांच्यासमोर झाली या प्रकरणी ७ साक्षीदारांच्या साक्षी वैद्यकीय पुरावागृह धरून विशेष न्यायाधीश सुरवसे यांनी आरोपी बापास वीस वर्षे सक्त मजुरी व वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली .तसेच दंड न भरल्यास एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात  आली आहे या खटल्यात सरकारच्या वतीने ऍडव्होकेट शितल डोके यांनी तर आरोपीच्या वतीने एडवोकेट झुरळे यांनी काम पाहिले कोर्ट पैरवी  म्हणून महिला कर्मचारी जमादार व काळे यांनी काम पाहिले .

Post a Comment

0 Comments