मौजे धनगरवाडी ग्रामपंचायतने सुंदरगाव योजनेत मिळवला प्रथम क्रमांक.
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
दहा लाखाचे मिळवले पारितोषक सरपंच नागनाथ घोडके यांचे उल्लेखनीय कार्य.
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापुर तालुक्यातील मौजे धनगरवाडी ग्रामपंचायतने आर.आर.(आबा) पाटील सुंदरगाव पुरस्कार योजनेत मिळवला प्रथम क्रमांक. धनगरवाडी ग्रामपंचायत तालुका स्मार्ट ग्रामपंचायत मध्ये प्रथम क्रमांक मिळवत १० लाखाचे पारितोषिक पटकावले.गाव परिसरातून सरपंच नागनाथ घोडके व ग्रामसेविका यांच्यावर होतो कौतुकाचा वर्षाव.आयोजित कार्यक्रमात धनगरवाडी ग्रामपंचायतचे सरपंच नागनाथ घोडके व ग्रामसेविका यांचा आमदार राणाजगजितसिंह पाटील , मा. जिल्हा अधिकारी श्री कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. धाराशिव श्री मौनक घोष यांच्या वतीने सत्कार करून विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या पुरस्कारसाठी मा. गटविकास अधिकारी तुळजापूर श्री हेमंत भिंगारदेवे ,विस्तार अधिकारी श्री ए.सी.कावळे , पंचायत विभाग उपमुख्य अधिकारी कुंभार,ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती घुगे प्रिती शिलाजी,
सरपंच श्री नागनाथ नामदेव घोडके,
उपसरपंच श्री राम श्रीमंत कदम ,ग्रामपंचायत सदस्य, सौ सुरेखा खंडू घोडके, सुवर्णा महादेव घोडके, जयश्री केशव एडके, अनिल किसन चव्हाण, वर्षा रमेश राठोड
, पोलिस पाटील श्री विठ्ठल हणमंत घोडके,तंटा मुक्त अध्यक्ष सुभाष केशव घोडके, उपाध्यक्ष श्री मनोहर शामराव दूधभाते सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी धनगरवाडी यांच्या सहकार्याने धनगरवाडी ग्रामपंचायत ला प्रथम क्रमांक चा मान मिळाला असल्याचे सरपंच नागनाथ घोडके यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

0 Comments