धाराशिव : शेतकऱ्याची चोरीस गेलेली म्हैस स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव ने केली परत.
धाराशिव : दिनांक 22.12.2025 रोजी शेतकरी नामे सूर्यकांत धोंडीराम धाकतोडे यांच्या शेतातून त्यांची दहा महिन्याची गाभण मुऱ्हा जातीची 01,40,000 रु किमतीची म्हैस चोरी गेली होती. सदर बाबत पोस्टे शिराढोण गु.र.नं. 02/2026 कलम 303(2) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दिनांक 04.01.2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक हे गस्त करीत पोस्टे शिराढोण हद्दीत आले असता धाबा पाटी, शिराढोण पारधीपेढी जवळ एक म्हैस व एक रेडकु रात्रीच्या अंधारात घेऊन जाताना दिसून आला. सदर बाबत संशय अल्याने त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे अधिक चौकशी करण्याकरिता नमूद इसम व जनावरांना पोलीस ठाणे शिराढोण येथे नेऊन चौकशी केली असता सदरची म्हैस ही पोस्टे शिराढोण गु.र.नं. 02/2026 कलम 303(2) मधील चोरीस गेलेली म्हैस असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी पंचनामा करून सदरची म्हैस व रेडकू कि. 01,40,000 रु. जप्त करून आरोपी नामे जालिंदर उर्फ पिंटू शंकर शिंदे, रा. ब्रह्मगाव, शेंडी पाटी, वाशी जि धाराशिव याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे दोन साथीधारासह सदर म्हैस चोरली असल्याची कबुली दिली त्यास पुढील कारवाई कामी पोलीस ठाणे शिराढोण यांच्या ताब्यात दिलेले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, मा.अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली पोनि श्री विनोद इज्जपवार, सपोनि श्री. सुदर्शन कासार,पोह/576 शौकत पठाण, पोह/289 जावेद काझी, पोह/929 प्रकाश औताडे, पोह/1275 फरहान पठाण, चापोह/539 रत्नदीप डोंगरे, चापोह662 नवनाथ गुरव यांनी केली आहे.

0 Comments