ब्रेकिंग :जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची तारीख बदलली -Breaking -Zp Election Live Update

Hot Posts

6/recent/ticker-posts

ब्रेकिंग :जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची तारीख बदलली -Breaking -Zp Election Live Update

 Breaking  :जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची तारीख बदलली -5 ऐवजी 7 तारखेला मतदान तर ,9 फेब्रुवारीला होणार मतमोजणी;राज्य निवडणूक आयोगाचा  निर्णय -Zp Election Live Update


मुंबई - राज्यात १२ जिल्हा परिषदांची निवडणूक ही पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ५ फेब्रुवारीला मतदान पार पडणार होते मात्र राज्याचे  उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अकाली अपघाती मृत्यूमुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने आज गुरुवारी दि,२९ रोजी घेतला आहे. यामध्ये आता नवीन वेळापत्रकानुसार मतदान ७ फेब्रुवारी होणार आहे तर मतमोजणी 9 फेब्रुवारी पार पडणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने याबाबतचे सुधारित आदेश जारी केले आहेत.

आयोगाच्या अधिकृत परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आली आहे. निवडणुकीशी संबंधित विविध बाबींचा विचार करून निर्णय घेतला आहे असे आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या नेत्यांच्या मोठ्या सभा ३० जानेवारीपर्यंत होणार नाहीत. त्यामुळे प्रचारासाठी अल्प दिवस मिळणार आहेत. एवढा कालावधी प्रचारासाठी पुरेसा नसल्याने निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे.

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असताना मोठ्या नेत्याचे निधन झाल्याचा प्रसंग या आधी उद्भवलेला नव्हता. असे पहिल्यांदाच घडत असल्याने सर्व बाबींचा विचार करून गुरुवारी  दि,२९ रोजी निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे .

📅 महत्त्वाच्या तारखा:

नोटीस प्रसिद्ध करणे: ३१ जानेवारी २०२६ (शनिवार) 📋

मतदानाचा दिवस: ७ फेब्रुवारी २०२६ (शनिवार) - सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३० पर्यंत 🗳️

मतमोजणी: ९ फेब्रुवारी २०२६ (सोमवार) सकाळी १०:०० वाजेपासून 🔢

📍 निवडणुका होणारे जिल्हे:

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर.

Post a Comment

0 Comments