हृदयद्रावक घटना : पोटच्या मुलाचा आईने गळा चिरून केला खून; मुलीवरही चाकूने सपासप वार आई पोलिसांच्या ताब्यात मुलीची मृत्यूची झुंज पुण्यातील वाघोली परिसरातील घटना-
पुणे: पुण्यातील वाघोली परिसरात एका मातीने आपल्याच पोटच्या गोळ्यांचा वैरी बनत मुलाची निर्गुण हत्या केली आणि मुलीला मरणाच्या दारात ढकले ज्या हाताने मुलांना वाढवले त्याच हाताने रक्ताचा सडा शिंपडल्याने संपूर्ण परिसरात दहशतीचे आणि हळहळीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी आईला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे तर गंभीर जखमी मुलगी रुग्णालयात मृत्यूची झुंज देत आहे हा धक्कादायक प्रकार मंगळवार दिनांक 27 रोजी वाघोली परिसरात उघडकीस आला या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट झाले नाही.या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की साईराज संतोष जायभाये असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे याप्रकरणी सोनी संतोष जायभाये हीला अटक करण्यात आली आहे. सोनीने मुलगी धनश्री वय १३ हिच्यावरी चाकूचे वार केले या घटनेत ती गंभीर जखमी झाली असून रुग्णालयात अति दक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू आहेत .जायभाये कुटुंबीय मूळचे नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील रहिवासी आहे नोकरीनिमित्त जायभाये कुटुंबीय पुण्यात आले असून ते सध्या वाघोलीतील बायफ रस्त्यावर वास्तव्यात आहे सोनीने हे कृत्य का केले याची निश्चित माहिती समजली नाही पोलीस चौकशी अनु उत्तरे देत असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.
पतीच्या व्यसनाधीनतेमुळे उचलले टोकाचे पाऊस
संतोष जायभाये हा पोकलेन मशीन वर चालक म्हणून काम करतो मात्र त्याला दारूची व्यसन होते त्यातून त्यांची पत्नी सोनी हिच्याशी भांडण होत असत संतोषच्या व्यसनामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची झाली होती त्यामुळे मुलांना मारून स्वतःही जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय सोनी हिने घेतला होता संतोष मंगळवारी सकाळी तिच्याशी भांडण करून बाहेर पडला होता त्यामुळे रागाने संतापलेल्या सोनीने साईराज याच्या गळ्यावर धारदार शस्त्राचे वार केले तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर तिने धनश्रीकडे आपला मोहरा वळवला तिच्यावरही ती चाकूचे वार करत असतानाच घर मालक रफिक पठाण यांनी धाव घेतली त्यामुळे तिचे प्राण वाचले अशी माहिती प्राथमिक तपासात पोलिसांना निष्पन्न झाली आहे.

0 Comments