चिवरी पंचायत समिती गणात तीन उमेदवार रंगणार;; महाविकास आघाडी ,महायुती व अपक्ष उमेदवार यांच्यात होणार सामना-
चिवरी - प्रतिनिधी/ प्रतिनिधी बिभिषन मिटकरी: (दि. २७ जानेवारी) तुळजापूर तालुक्यातील अनदुर जिल्हा परिषद गटातील चिवरी पंचायत समिती गणातील चित्र दि.२७ जानेवारी रोजी स्पष्ट झाले असुन चिवरी पंचायत समिती गणात महाविकास आघाडीकड़्न उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय भोसले तसेच भारतीय जनता पार्टी पक्षाकडून प्रवीण भोसले व अपक्ष उमेदवार माजी सैनिक संभाजी बळीराम काळजाते अशी तिरंगी लढत होणार असुन या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांसाठी अर्ज माघार घेण्याची दि. २७ जानेवारी अंतिम तारीख होती. दि.२७ जानेवारी रोजी सर्वच जिल्हा परिषद पंचायत समिती गट गणातील चित्र स्पष्ट झाले असुन आजपासून ग्रामीण भागात खर्या अर्थाने राजकीय धुरळा उडणार आहे. तुळजापूर तालुक्यातील चिवरी पंचायत समिती गणातीलही चित्र स्पष्ट झाले असुन याठिकाणी तिरंगी लढत रंगणार आहे. चिवरी पंचायत समिती गणामध्ये एकाच गंधोरा गावातील दोन उमेदवार या गणामध्ये आमने-सामने निवडणूक लढत आहेत तर चिवरी येथील एकमेव अपक्ष उमेदवार संभाजी काळजाते निवडणुकीच्या रींगणात उतरवल्याने महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारासाठी या गावातील मताचे दान पारड्यात घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
चिवरी पंचायत समिती गणात तिनही उमेदवार त्यांच्या त्यांच्या परीने जोमात तयारीला लागले आहेत. पंचायत समीती गणातील बदलेले राजकारण व सुज्ञ असलेली जनता कुणाच्या पारड्यात मताचे दान टाकणार व चिवरी पंचायत समिती गणातील या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार..? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 Comments