हॉटेल चालकावर गोळीबार प्रकरणातील दोन आरोपींना १० वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल-Dharashiv District and Session Court Judgement

Hot Posts

6/recent/ticker-posts

हॉटेल चालकावर गोळीबार प्रकरणातील दोन आरोपींना १० वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल-Dharashiv District and Session Court Judgement

हॉटेल चालकावर गोळीबार   प्रकरणातील दोन आरोपींना १० वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल-


धाराशिव: धाराशिव तालुक्यातील भंडारवाडी येथे तुळजापूर ते लातूर मार्गावरील एका हॉटेलमध्ये सेवा देण्याच्या कारणावरून दोन आरोपींनी हॉटेल चालकावर गावठी पिस्तूल व चाकूने हल्ला करून त्यांना जखमी केले होती .ही घटना 3 फेब्रुवारी 2021 रोजी बेंबळी पोलीस ठाण्याचे हद्दीत घडली होती. या प्रकरणातील दोन आरोपींना न्यायालयासमोर आलेला पुरावा व जिल्हा शासकीय अभियोक्ता यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून १० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व प्रत्येकी 40 हजार रुपयांचा दंड ठोठावला  आहे.

याबाबत जिल्हा सरकारी अभियोक्ता  यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर गुन्ह्यातील आरोपी अर्जुन नागनाथ बडवणे अभिषेक उद्धव विश्वकर्मा व इतर तीन आरोपी हे दिनांक 3 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी बारा ते एक वाजेच्या दरम्यान बेंबळी  पोलीस ठाण्याचे हद्दीतील भंडारवाडी शहरातील हॉटेल रिलॅक्स येथे आले होते .यावेळी हॉटेलमध्ये जेवणाची व्यवस्था देण्याच्या कारणावरून आरोपी अर्जुन बडवणे यांनी जवळच्या गावठी पिस्तूल मधून हॉटेलमध्ये जमिनीवर गोळी झाडत हॉटेल चालक अविनाश मोरे यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी दुसरा आरोपी अभिषेक उद्धव विश्वकर्मा यांनी त्याच्या हातातील चाकून फिर्यादीस ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करत असताना तेथील कामगाराने वरच्या मजल्यावर झोपलेली हॉटेल चालक यांचे वडील बाळासाहेब मोरे यांना बोलावून आणले ते आरोपीला समजावून सांगत असताना आरोपी बडवणे  यांनी जवळील गावठी पिस्तूल मधून बाळासाहेब मोरे यांच्यावर गोळी झाडत त्यांना गंभीर जखमी केले .यावेळी अविनाश मोरे व कामगारांनी अभिषेक विश्वकर्मा यास पकडून ठेवले तर इतर आरोपी कारमधून पळून गेले सदरची घटना हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती .

या प्रकरणी अविनाश मोरे यांनी पोलीस ठाणे बेंबळी  येथे फोन द्वारे माहिती देऊन तक्रारी दिली होती .या प्रकरणी तत्कालीन सहायक  पोलीस निरीक्षक एम.जी शेंडगे व इतरांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले तसेच आरोपीने गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही केलेला गोळीबार प्रकरणी तेथील पोलिसांकडून जप्त पिस्तूल बेंबळी  पोलिसांनी ताब्यात घेत न्यायालयात सादर केले .या प्रकरणाची अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश क्रमांक १ टी.जी. मिटकरी यांच्यासमोर सुनावणी झाली यावेळी पोलिसांनी सादर केलेले पुरावे अभियोग पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील महिंद्र देशमुख व अतिरिक्त शासकीय वकिल  एस. एस सुरवंशी यांनी मांडलेली बाजू ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी अर्जुन नागनाथ बडवणे व अभिषेक उद्धव विश्वकर्मा यांना बेकायदा शस्त्र बाळगले खुनाचा आदी कारणात्सव दोषी ठरवून १० वर्षे सक्तमजुरी  व प्रत्येकी 40 हजार रुपयांचा दंड ठोठावला  आहे.

Post a Comment

0 Comments