धाराशिव: दरोडा टाकण्याच्या तयारीत असणारे आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
धाराशिव : येरमाळा व कळंब पोलीस ठाण्याचे हद्दीतील हायवे वरून जाणारे वाहनाची अडवून लुटमार होण्याचे प्रमाण वाढल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रात्रग्रस्त पेट्रोलिंग करीत असताना कळंब ते केज जाणारे रोडच्या बाजूस कळंब शहरातील द्वारका नगरीचे जवळ बंद असलेल्या पेट्रोल पंपामध्ये दोन पिकप वाहन व काही संशयित इसम थांबलेले दिसले पथकाचे वाहन पाहून काहीसं तिथून पळण्याच्या तयारीत असताना त्यांना पथकातील पोलीस अंमलदार यांनी जागेवरच पकडले. त्या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तेथे थांबण्याची कारण व नावाबाबत विचारपूस केली असता त्यांनी सुरुवातीस उडवा उडवीचे उत्तरे दिली त्यांना अधिक विश्वासात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावे चंद्र भास्कर काळे वय 35 वर्षे सुभाष उर्फ हरि भास्कर काळे वय 37 वर्षे श्यामसुंदर बिबीशन काळे वय 34 वर्षे तिघे राहणार कनेरवाडी चा पाटील तालुका कळंब नवनाथ अनिल शिंदे वय 26 वर्षे राहुल अनिल शिंदे वय 24 वर्षे राहणार दोघे लक्ष्मी पारधी पिढी तेरखेडा तालुका वाशी बालाजी माणिक काळे वय 39 वर्षे राहणार शिराढोण दत्ता हिरा पवार वय 34 वर्षे राहणार लोटा पूर्व तालुका कळंब असे सांगितले त्यांनी सांगितले नाव बाबत पथका संशय वाटल्याने त्यांची माहिती घेतली असता त्यांच्यावर गंभीर स्वरूपाची गुन्हे दाखल असल्याची दिसले.
त्यांच्यावर जास्त संशय वाढल्याने पथकाने पंचा समक्ष सदर दोन पिकप वाहनाची पाहणी केली असता आत मध्ये दरोडा टाकण्याचे साहित्य एक लोखंडी धारदार तलवार एक स्टीलचा रोड 4 मोबाईल मिळून आले पिकप वाहना सह एकूण 10 लाख 89 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नमूद आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे कळंब येथे गुन्हा रजिस्टर नंबर 4 / 2026 कलम 310 (4) 310 (5) bns कलम 4 25 शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नमूद आरोपीतांचे अभिलेखाचे पाहणी केले असता त्यांच्यावर दरोडा जबरी चोरी वाहन चोरी असे माल विषयीचे जबरी गुन्हे दाखल आहेत .सदरची कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची पोलीस निरीक्षक श्री विनोदी इज्जतपवार साहेब पोलीस निरीक्षक सचिन खटके पोलीस जानराव नितीन जाधव बबन जाधवर अमोल निंबाळकर दयानंद गाडेकर बळीराम शिंदे, अशोक ढगारे पुष्कर ,मुंगळे हेड कॉन्स्टेबल महबूब अरब, प्रकाश बोईनवाड यांच्या पथकाने केली आह.

0 Comments