परंडा : आत्मदहन करणारच अशी धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल -Paranda Crime

Hot Posts

6/recent/ticker-posts

परंडा : आत्मदहन करणारच अशी धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल -Paranda Crime

परंडा : आत्मदहन करणारच अशी धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल  -Paranda Crime   


 

धाराशिव: पोलीस ठाणे परंडा येथे आत्मदहन करण्याच्या निर्णयावर ठाम राहून एका महिलेने दिनांक 25 रोजी प्रशासनास वेठीस धरून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यामध्ये फिर्यादी सूर्याजीत जगदाळे यांच्या तक्रारीवरून नमूद महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की आरोपी नामे-अनिता बाळासाहेब होरे, रा. पिंपळवाडी ता. परंडा ह.मु. श्रीपुर ता. माळशिरस जि. सोलापुर यांनी दि.25.01.2026 रोजी 19.00 वा. सु. पोलीस ठाणे परंडा येथे आत्मदहन करण्याच्या निर्णयावर ठाम राहुन प्रशासनास वेठीस धरुन गट विकास अधिकारी श्री. शिंदे हे त्यांचे शासकीय कर्तव्य पार पाडत असताना त्यांनी दिलेले कायदेशीर पत्र व पोलीस ठाणे परंडाचे प्रभारी अधिकारी श्री चोरमले यांनी बी.एन.एस.एस चे (Bhartiya Nyaya Sanhita)कलम 168 प्रमाणे दिलेले नोटीस हे न स्वीकारता त्याचा अवमान करुन आत्मदहानार्थी यांना आत्मदहनापासुन परावृत्त करीत असताना नमुद आरोपी  म्हणाली की, मी आत्मदहन करणारच अशी धमकी देवून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुर्यजित अरुण जगदाळे, नेमणुक पोलीस ठाणे परंडा यांनी दि.26.01.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे परंडा येथे भा.न्या.सं.कलम 132, 121,224 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास परंडा पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments