परंडा तालुक्यात पुन्हा बिबट्याची एन्ट्री म्हशीच्या रेडकाचा पाडला फडशा; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण नागरिकांनी सतर्क राहण्याचे वन विभागाचे आव्हान-
धाराशिव : परंडा तालुक्यामध्ये बिबट्या सदृश्य प्राण्यांनी पुन्हा एकदा एन्ट्री केल्याने ग्रामीण भागात नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे परंडा तालुक्यातील वस्तीवर बिबट्याने एका रेडकावर हल्ला करून फडशा पडला ही घटना शुक्रवार दिनांक 9 रोजी रात्री साडेदहाच्या समोर घडली या घटनेमुळे कपिलापुरी परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की परंडा तालुक्यातील कपिलापूर येथील राजेंद्र मसलकर यांनी वस्तीवर त्यांची रेडी बांधली होती शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने या रेडकावर अचानक हल्ला केला व या हल्ल्यात रेडू गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी झाले या दुर्घटनेमुळे तीस हजार रुपयाचे पशुपालक श्री मसलर कर यांनी यांचे नुकसान झाल्याचे सांगितले वन विभागाने घटनास्थळाचा पंचनामा केला आहे गेल्या वर्षी ही परंडा तालुक्यात बिबट्याने मोठा धुमाकूळ घातला होता तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जनावरावर हल्ले झाले होते अखेर 21 मार्च 2025 रोजी कपिलापुरी शिवारात वन विभागाच्या पथकाने पिंजरा लावून बिबट्या जेरबंद केला होता या भागामध्ये पुन्हा दहा महिन्यानंतर बिबट्याने एन्ट्री केली आहे त्यामुळे शेतात काम करणारे शेतकरी शेतमजूर शेत वस्तीवरील नागरिक पशुपालन यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्या प्राणी वावरत असल्याने शेतकरी व नागरिकांनी रात्रीच्या वेळी विशेष खबरदारी घ्यावे जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत संशयास्पद प्राणी दिसल्यास तत्काळ वन विभागाशी कळववे असे आव्हान वनविभागाच्या वतीने करण्यात आली आहे. शेताकडे एकटे कोणीही जाऊ नये तसेच हातात काठी बॅटरी घेऊन जावे अशाच सतर्क राहण्याच्या नागरिकांना सूचना देण्यात आले आहेत. याप्रकरणी या बिबट्या प्राण्याचा तात्काळ बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे तसेच बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी झालेल्या नुकसानी बाबत शेतकऱ्यांना तात्काळनुसार भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.


0 Comments