चिवरी पंचायत समिती गणातून उबाठा गटाकडुन तानाजी जाधव व मधुकर लोंढे निवडणूक लढवण्यास इच्छुक
चिवरी/प्रतिनिधी बिभिषन मिटकरी : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेपल्या आणि तुळजापूर तालुक्यातील सर्वच मतदार संघात जो तो आपणालाच उमेदवारी मिळावी यासाठीच धडपडत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अणदुर जिल्हा परिषद गटातील चिवरी पंचायत समिती गण हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आला आहे यामुळे या गणात अनेक इच्छुक उमेदवारांची गर्दी दिसून येत आहे . या चिवरी पंचायत समिती गणातून चिवरी येथील शिवसैनिक तानाजी प्रभाकर जाधव व मधुकर तुळशीराम लोंढे हे उबाठा गटाकडून इच्छुक असून उमेदवारी मिळाल्यास निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे. तानाजी प्रभाकर जाधव हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक असल्याचे संबंध परिचित आहे. ते 2007 पासून शिवसेना पक्षाचे काम करतात त्याचबरोबर मधुकर लोंढे हे देखील निष्ठावंत शिवसैनिक म्हणून परिचित आहेत त्यांनी देखील उबाठा गटाकडून उमेदवारी मिळाल्यास निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सांगितले आहे तसे या दोघांनीही पक्षाकडे इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल केली आहे.
एकंदरीत चिवरी पंचायत समिती गणात उबाठा गटाकडून आतापर्यंत तीन जणांनी उमेदवारीसाठी मागणी केली आहे यामध्ये नेताजी उर्फ बबन शिंदे, मल्लिनाथ सारणे तसेच गंधोरा येथील संजय भोसले या शिवसैनिकांनी मागणी केली आहे. त्याचबरोबर आता चिवरी येथील तानाजी जाधव , मधुकर लोंढे या शिवसैनिकांनी उमेदवारीची मागणी पक्षाकडे केली आहे. आता एकंदरीत उबाठा गटांमध्ये इच्छुकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे .त्यामुळे उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याकडे गणातील नागरिकांचे लक्ष वेधले आहे.

0 Comments