तुळजापूर : १२जानेवारीला जेष्ठ समाजसेवक रमाकांत कुलकर्णी यांचा हिप्परगा ताड येथे नागरी सन्मान-
----------------------------------------
इटकळ (दिनेश सलगरे):-तुळजापूर तालुक्यातील हिप्परगा (ताड,) येथील सहयोग निर्मीतीचे संस्थापक जेष्ठ समाजसेवक रमाकांत बापु कुलकर्णी यांचा १२ जानेवारी रोजी नागरी सन्मान होणार आहे.
रमाकांत कुलकर्णी यांनी ऐंशीच्या दशकात स्वताचा व्यवसाय, नोकरी सोडून छोट्या खेड्यात जाऊन त्यांनी लोकांसाठी काम करायचं ठरवलं, उपेक्षित वंचित व दुर्बल घटकांसाठी काम करीत करीत त्यांनी सहयोग निर्मीती संस्थेची स्थापना केली आणि १९९३ च्या प्रलयंकारी भुकंपामध्ये उध्वस्त झालेली गावे उभी करण्यासाठी झोकुन देऊन पती पत्नीने लक्षवेधी काम केले आहे , दुष्काळ हटवू माणुस जगवू हे अभियान राबवून मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे,जनतेचे मुलभूत प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे,शहरी कष्टकऱ्यांचे विस्थापन,महाराष्ट्रातला पाणीप्रश्न,नदी प्रदुषण, हवामान बदल अशा नाना विषयांमध्ये काम करीत जमेल तिथे सरकारी योजनांची मदत घेत आणि आवश्यक तेंव्हा प्रशासनाला जाब विचारत लोकांमध्ये राहुन लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी धडपडणाऱ्या ध्येयवादी, अनेक शासकीय, निमशासकीय पुरस्कार प्राप्त करणा-या रमाकांत बापु कुलकर्णी यांचा नागरी सन्मान हिप्परगा ताड येथील ग्रामस्थांकडून आयोजित करण्यात आलेला आहे
यासाठी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, पर्याय संस्थेचे संस्थापक विश्वनाथ तोडकर, समाज विकास संस्थेचे अध्यक्ष भुमिपुत्र वाघ,स्पर्श ग्राणिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक रमाकांत जोशी,हॅलो मेडिकल फाउंडेशन संस्थेच्या अध्यक्षा डॉ शुभांगी अहंकारी,नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन यादव, परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक मारुती बनसोडे,अंबव्वा महिला मंडळाच्या अध्यक्षा कस्तुरा कारभारी, पौर्णिमा सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सुजाता चव्हाण,यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे अशी माहिती आयोजक माजी पंचायत समिती सदस्य अरुण दळवे यांनी कळवली आहे.

0 Comments