तुळजापूर : दिर भावजयीच्या अनैतिक संबंधात अडसर, ठरत असल्याने १३ वर्षीय मुलाचा कुऱ्हाडीने घाव घालून खून;२४ तासाच्या आत आरोपी चुलत्याच्या मुसक्या आवळल्या तामलवाडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई-Tamawadi Police Station Crime News
धाराशिव : दिर भावजयीच्या अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या एका तेरा वर्षीय पुतण्याचा कुऱ्हाडीने घाव घालून खुन केल्याची धक्कादायक घटना तामलवाडी पोलीस ठाण्याचे हद्दीत उघडकीस आली आहे .याप्रकरणी या घटनेचा तपास करून आरोपी चुलत्यास तामलवाडी पोलिसांनी 24 तासाच्या आत अटक करून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे तामलवाडी सह परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून झालेली अधिक माहिती अशी की दिर भावजयीच्या अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या १३ वर्षीय मुलाचा कुऱ्हाडीने घाव घालून जिवे मारून प्रेत तलावाजवळ गवताखाली फेकून दिले सदरची घटना तुळजापुर तालूक्यातील तामलवाडी साठवण तलावानजिक 0५.01.2025 रोजी उघडकीस आली. यावर तामलवाडी पोलीस ठाणे गुरनं 04/2026 कलम 103(1) हा दि.06.01.2026 रोजी गुन्हा नोदंवला होता.
सोलापुर धुळे राष्ट्रीय महामार्गावर तामलवाडी शिवारात कदम यांची शेती आहे ती शेती दत्ता कोरे हा बटईने करत होता. सदर ठिकाणी उमरगा तालुक्यातील कोळसुर येथील ओमकार देवीदास कांबळे हा भावजयीला घेवून सालगडी म्हणून कामास होता. भावजयी ज्योती कांबळे हीचा १३ वर्ष वयाचा मुलगा कृष्णा सदानंद कांबळे हा कधी वडीलाकडे गावी तर कधी तिचेकडे राहायचा. मुलगा कृष्णा हा चुलता व आई यांच्या अनैतिक संबधाची माहिती वडीलांना सांगत होता. कृष्णा कांबळे हा दिर भावजयीच्या अनैतिक संबधात अडसर ठरू लागला होता. कृष्णा सर्व माहीती भाउ सदानंद कांबळे याला सांगतो याचा राग आरोपी ओमकार कांबळे यास आल्याने त्याने चिडुन 01 जानेवारी रोजी दुपारी १२.00 वा .सु. च्या सुमारास तामलवाडी साठवण तलावामधील पाणी उपसा करणाऱ्या विद्युत पंम्पाचा पाईप बसवायचा म्हणून तलावामधे कृष्णा यास घेवून गेला. ओमकार कांबळे याने कृष्णा कांबळे यास कुऱ्हाडीचा घाव घालून जिवे ठार मारले व प्रेत गवता मधे फेकुन देवून तेथुन पसार झाला होता. तामलवाडी पोलीसांनी सदर घटनेची प्रथम अकस्मात मृत्यु नंबर 02/2026 कलम 194 बी.एन.एस.एस. अन्वये दाखल करुन सदर अमृ मध्ये मयताची ओळख पटवून गुन्हा दाखल करुन गुप्त बातमीदार व तांत्रीक विशलेषनावरुन ओमकार देविदास कांबळे याचा शोध घेवून उमरगा तालूक्यातील काळसुर गावातून ताब्यात घेवून त्याचे कडे नमुद गुन्हे बाबत चौकशी केली त्यांनी सदरचा गुन्हे केल्याचे कबुली दिली.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना, उप विभागीय पोलिस अधिकारी डॉ निलेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सपोनि गोकुळ ठाकुर, पोह-जुबेर काझी दिनकर तोगे, पोअं-सुरज नरवडे, उमेश माने, नजीर बागवान, चालक पोह- तुराब शेख, हनमंत कोरे, नितीन भोसले, यांनी केली आहे. या घटनेचा अधिक तपास तामलवाडी पोलीस करत आहेत

0 Comments