Breaking News -जनावरे चोरणाऱ्या ३ आरोपींच्या तामलवाडी पोलिसांनी आवळल्या मुसक्या ताब्यात.” नांदुरी येथील म्हशी चोरीचा उलगडा

Hot Posts

6/recent/ticker-posts

Breaking News -जनावरे चोरणाऱ्या ३ आरोपींच्या तामलवाडी पोलिसांनी आवळल्या मुसक्या ताब्यात.” नांदुरी येथील म्हशी चोरीचा उलगडा

जनावरे चोरणाऱ्या ३ आरोपींच्या तामलवाडी पोलिसांनी आवळल्या मुसक्या  ताब्यात.” नांदुरी येथील म्हशी चोरीचा उलगडा


तुळजापूर प्रतिनिधी /रुपेश डोलारे : मागील वर्षी 2025 मध्ये तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीचा उलगडा तामलवाडी पोलिसांनी केला आहे. यामध्ये तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे व त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


 या घटनेबाबत पोलिसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ,माहे डिसेंबर 2025 मध्ये जनावर चोरी संबंधाने पोलीस ठाणे तामलवाडी येथे गुन्हे दाखल करण्यात आले होते. नमुद गुन्ह्यात तामलवाडी पोलिसांनी तांत्रिक विषलेशनावरुन व गोपनीय बातमीदार यांचे मदतीने दोन संशयित इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे -अजीम निजाम सय्यद, निलेश नागनाथ तानवडे राहणार सावरगाव रा. सावरगाव यांचेकडे  नमुदगुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी डिसेंबर मध्ये नांदुरी येथील तीन म्हशी चोरल्याचे कबूल केले. त्यातील एक म्हैस लातूर येथील सोहेल साजिद कुरेशी यांना विकली असल्याचे त्यांनी सांगितले यामध्ये पोलिसांनी सोहेल कुरेशी यांना ताब्यात घेवून गुन्ह्याचे पुढील तपासात त्यांनी म्हैस विक्री केल्याची रक्कम जप्त केली असून आरोपी नामे अजीम निजाम सय्यद रा. सावरगाव याचे कडून दोन म्हैसी जप्त करण्यात आले आहेत. सदर गुन्ह्यामध्ये पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यामध्ये आरोपीकडून दोन म्हैस व म्हैसीची वाहतुक करणारे वाहन जप्त केले आहे. जनावर चोरणारा आरोपी नामे- अजीम निजाम सय्यद रा. सावरगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव याच्याकडून आणखीन जनावर चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यताअसून तामलवाडी पोलीस पुढील तपास करत आहे.

सदरची कारवाई मा.रितू खोखर मॅडम पोलीस अधीक्षक सो धाराशिव, मा. शफाकत आमना मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक सो धाराशिव, मा. निलेश देशमुख सो,उपविभागीय पोलीस अधिकारी तुळजापूर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप टेकाळे, पोह/298 तोगे,/1531 काझी, पोअ/1523 सुरज नरवडे, पोअ/311 गोपाळ सलगर, पोअ/1599 गायकवाड,पोअ/536 शेख, नितीन भोसले यांनी केली.

Post a Comment

0 Comments