रेशनच्या वादातून बाभळगावात मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल-धाराशिव जिल्हातील घटना -Breaking News Crime

Hot Posts

6/recent/ticker-posts

रेशनच्या वादातून बाभळगावात मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल-धाराशिव जिल्हातील घटना -Breaking News Crime

⛔ रेशनच्या वादातून बाभळगावात मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल-धाराशिव जिल्हातील घटना -Breaking News Crime 


धाराशिव  (प्रतिनिधी): कळंब तालुक्यातील बाभळगाव येथे रेशनच्या मालाच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. 18 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7.00 वाजण्याच्या सुमारास बाभळगाव शिवारात ही घटना घडली. फिर्यादी दिगंबर नरहरी बेडके (वय 42, रा. बाभळगाव, ता. कळंब, जि. धाराशिव) यांच्याकडे आरोपींनी रेशनचा माल मागितला. यावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाला.

वादाचे रूपांतर पुढे मारहाणीत झाले असून आरोपी प्रेमनाथ मधुकर वाघमारे, राम मधुकर वाघमारे (दोघे रा. बाभळगाव, ता. कळंब), अक्षय विष्णु धोंगडे (रा. धारुर, ता. धारुर, जि. बीड) आणि लिंबराज बोबडे (रा. बोबडेवाडी, ता. केज, जि. बीड) यांनी फिर्यादीस शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी तसेच लोखंडी सळई व लाकडी काठीने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात दिगंबर बेडके जखमी झाले असून आरोपींनी त्यांना जिवे ठार मारण्याची धमकीही दिली.

या घटनेनंतर जखमी बेडके यांनी दि. 23 एप्रिल 2026 रोजी येरमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(2), 115(2), 352, 351(2)(3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास येरमाळा पोलीस करीत असून आरोपींचा शोध सुरू आहे. गावात या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Post a Comment

0 Comments