बोरगाव येथे घरफोडी ; रोख रकमेसह चांदीचे दागिने लंपास- नागरिकांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Hot Posts

6/recent/ticker-posts

बोरगाव येथे घरफोडी ; रोख रकमेसह चांदीचे दागिने लंपास- नागरिकांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बोरगाव येथे घरफोडी ; रोख रकमेसह चांदीचे दागिने लंपास- नागरिकांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

तुळजापूर : तालुक्यातील बोरगाव येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत रोख रक्कम व चांदीचे दागिने असा एकूण १ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आप्पाराव शिवाजी मुळे (वय ६२, रा. बोरगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव) यांच्या राहत्या घरात दि. १९ मे २०२६ रोजी पहाटे १ ते सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे कडी-कोंडा तोडून प्रवेश केला. घरातील रोख रक्कम ४० हजार रुपये तसेच चांदीचे दागिने असा एकूण १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला.

सकाळी घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

या प्रकरणी आप्पाराव मुळे यांनी दि. २० मे २०२६ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४), ३०५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

घटनेचा पुढील तपास नळदुर्ग पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments