मंगरुळ-सरडेवाडी रोडवर भीषण अपघात ; दुचाकीच्या समोरासमोर धडकेत युवक ठार-Mangurl Tuljapur Accident News

Hot Posts

6/recent/ticker-posts

मंगरुळ-सरडेवाडी रोडवर भीषण अपघात ; दुचाकीच्या समोरासमोर धडकेत युवक ठार-Mangurl Tuljapur Accident News

मंगरुळ-सरडेवाडी रोडवर भीषण अपघात ; दुचाकीच्या समोरासमोर धडकेत युवक ठार-Mangurl Tuljapur Accident News 


तुळजापूर : तालुक्यातील मंगरुळ-सरडेवाडी रोडवर झालेल्या भीषण दुचाकी अपघातात एका २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून एक जण किरकोळ जखमी झाला आहे. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात निष्काळजीपणे वाहन चालविणाऱ्या दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत युवकाचे नाव रुपेश रामेश्वर स्वामी (वय २५, रा. मंगरुळ ता. तुळजापूर जि. धाराशिव) असे आहे. दि. १३ मे २०२६ रोजी पहाटे सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास रुपेश स्वामी हे मोटरसायकल क्रमांक एमएच २५ बीबी ०९१२ वरून जात होते. दरम्यान, मंगरुळ ते सरडेवाडी रोडवरील मंगरुळ शिवारात समोरून येणाऱ्या मोटरसायकल क्रमांक एमएच १३ सीव्ही १४७८ च्या चालकाने भरधाव व निष्काळजीपणे तसेच चुकीच्या दिशेने वाहन चालवून समोरासमोर जोरदार धडक दिली.

या अपघातात रुपेश स्वामी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर या अपघातात आर्यन धुरगुडे हे किरकोळ जखमी झाले आहेत.

या प्रकरणी आरोपी अजमोद्दीन मुबारक व्होगे (रा. आरळी खुर्द ता. तुळजापूर जि. धाराशिव) याच्याविरुद्ध आर्यन धुरगुडे यांनी दि. २० मे २०२६ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०६, २८१, १२५(अ), १२५(ब) सह मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास तुळजापूर पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments