/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> युवा नेते मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिप सदस्य सुनील बनसोडे यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम

Hot Posts

युवा नेते मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिप सदस्य सुनील बनसोडे यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम

युवा नेते मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिप सदस्य सुनील बनसोडे यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम.


""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

शहापूर गटातील गावात सी.सी.टी.व्ही.कॅमेराचे मोफत वाटप.

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप.

""""""""""'''''""""""""""""""""""""""""""""""

इटकळ (दिनेश सलगरे):- युवा नेते मल्हार पाटील यांच्या वाढ दिवसानिमित्त शहापूर गटाचे जिल्हा परिषद सदस्य सुनील बनसोडे यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन.मौजे इटकळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे जिल्ह्याचे युवा नेतृत्व मल्हार दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या वतीने इटकळ येथे श्री सुनील भाऊ बनसोडे जिल्हा परिषद सदस्य  यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आले तर शहापूर गटातील चोऱ्यांचे वाढते प्रमाण पाहून जिल्हा परिषद सदस्य सुनील बनसोडे यांच्या वतीने आवश्यक त्या गावी सी.सी.टी. व्ही. कॅमेरे मोफत वाटप करण्यात आले.यावेळी शहापूर जिल्हा परिषद सदस्य सुनील भाऊ बनसोडे ,माजी सरपंच अरविंद पाटील, भाजपा युवा मोर्चाचे सचिन घोडके, बूथ प्रमुख श्रीकृष्ण मुळे, कबीर मिटकरी, उपसरपंच फिरोज मुजावर ,महादेव सोनटक्के, रामराजे पाटील, माजी उपसरपंच हुसेन मकानदार , रंगा गायकवाड, योगेश उपासे, राज लोहार,अनिल भोपळे ,मुख्याध्यापक सतीश ढोणे  शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहापूर गटातील जिल्हा परिषद सदस्य सुनील बनसोडे यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक गाव परिसरातून केले जात आहे.

Post a Comment

0 Comments