/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> पंढरपूरच्या सुपुत्राची २४ वर्षांची देशसेवा पूर्ण; विक्रम नाईकनवरे भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त

Hot Posts

पंढरपूरच्या सुपुत्राची २४ वर्षांची देशसेवा पूर्ण; विक्रम नाईकनवरे भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त

पंढरपूरच्या सुपुत्राची २४ वर्षांची देशसेवा पूर्ण; विक्रम नाईकनवरे भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त

पंढरपूर : प्रतिनिधी

पंढरपूरचे सुपुत्र विक्रम राजाराम नाईकनवरे यांनी भारतीय सैन्य दलात तब्बल २४ वर्षे ३० दिवसांची प्रदीर्घ, निष्ठावंत आणि गौरवास्पद सेवा बजावल्यानंतर नुकतीच सेवानिवृत्ती घेतली. देशसेवेचे कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडत विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळणाऱ्या नाईकनवरे यांच्या स्वगृही परतण्याने पंढरपूर परिसरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

विक्रम नाईकनवरे हे २ ऑगस्ट २००२ रोजी भारतीय सैन्य दलातील कोअर ऑफ सिग्नलमध्ये दाखल झाले. सैन्य सेवेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी देशाच्या विविध भागांत काम करताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि जबाबदारीची जाणीव या गुणांच्या जोरावर त्यांनी आपल्या सेवाकाळात उल्लेखनीय कामगिरी केली.

विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या

नाईकनवरे यांनी पंजाब येथे अन्न पुरवठा निरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. त्याचबरोबर त्यांनी ड्रिल इन्स्ट्रक्टर आणि डब्ल्यूटी उस्ताद म्हणूनही सेवा बजावली. हिमाचल प्रदेश येथे आर.एच.एम., गोवा येथे सी.एच.एम., तर पंजाब येथे सी.क्यू.एम. अशा विविध पदांवर काम करण्याची संधी त्यांना मिळाली.

सैन्य दलात नव्याने दाखल होणाऱ्या रिक्रूट तसेच अधिकाऱ्यांना आणि ज्युनिअर लीडर ऑफिसर्सना प्रशिक्षण देण्यातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. आपल्या अनुभवाचा उपयोग नव्या पिढीतील जवानांना घडविण्यासाठी त्यांनी केला.

सैन्य सेवेसोबत शिक्षणाचीही कास

कर्तव्य बजावत असतानाच शिक्षणाची आवड कायम ठेवत विक्रम नाईकनवरे यांनी ग्रॅज्युएशनपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सैन्य सेवेतील जबाबदाऱ्या, प्रशिक्षण आणि विविध ठिकाणी होणाऱ्या नियुक्त्यांमधून वेळ काढत शिक्षण पूर्ण केल्याने त्यांच्या जिद्दीचे आणि मेहनतीचे दर्शन घडते.

आई-वडिलांची प्रेरणा, आजीचा आशीर्वाद

सेवानिवृत्तीनंतर आपल्या भावना व्यक्त करताना विक्रम नाईकनवरे यांनी, “आई-वडिलांची प्रेरणा आणि आजीच्या आशीर्वादामुळे आपण देशसेवेचे हे कर्तव्य पूर्ण करू शकलो,” अशी भावना व्यक्त केली. कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळेच सैन्य सेवेत प्रदीर्घ काळ प्रामाणिकपणे काम करता आले, असेही त्यांनी नमूद केले.

तब्बल २४ वर्षांहून अधिक काळ देशाच्या सेवेत राहून विविध जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर विक्रम नाईकनवरे आता सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या या प्रदीर्घ देशसेवेबद्दल पंढरपूर परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांची कारकीर्द तरुणांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.


Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>