/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> बुकनवाडीत मोटारसायकल नेण्याच्या कारणावरून तरुणाचा खून; पाच जण गंभीर जखमी-Murder Crime News Dharashiv District

Hot Posts

बुकनवाडीत मोटारसायकल नेण्याच्या कारणावरून तरुणाचा खून; पाच जण गंभीर जखमी-Murder Crime News Dharashiv District

बुकनवाडीत मोटारसायकल नेण्याच्या कारणावरून तरुणाचा खून; पाच जण गंभीर जखमी-Murder Crime News Dharashiv District 


विठ्ठल-रुक्माई चौकातील धक्कादायक घटना; ढोकी पोलिस ठाण्यात 20 हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल

धाराशिव : बुकनवाडी येथे मोटारसायकल घेऊन जाण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हिंसक हल्ल्यात होऊन २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास बुकनवाडी येथील विठ्ठल-रुक्माई चौकात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुकनवाडी येथील महेश सुरेश चामे (वय २४) याच्यासह मारुती परगे, काका परगे, करण आवले, सतीश आवले व नाना आवले यांच्यावर आरोपींनी एकत्रितपणे हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मोटारसायकल घेऊन जाण्याच्या कारणावरून वाद झाल्यानंतर आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून हल्ला केल्याचा आरोप आहे.

या हल्ल्यात महेश चामे याच्या पोटात धारदार हत्याराने वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. तसेच इतर जखमींना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी तसेच काठ्या, कुऱ्हाड, कोयता, कत्ती, विळा व तलवारीसारख्या धारदार हत्यारांनी मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी सुरेश आप्पाराव चामे (वय ४०, रा. बुकनवाडी) यांनी दि. १२ सप्टेंबर रोजी ढोकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून बन्सी काळे, पिंटू काळे, देवराव काळे, कोंबड्या काळे, दत्ता काळे, बेगा काळे, शोभा काळे, यमुना काळे, कैलास काळे, पोपट शिंदे, कारकून शिंदे, महादेव शिंदे, मोतीराम काळे, तानाजी काळे, बादल काळे, मुकरा काळे, सचिन शिंदे, वैशाली शिंदे, गितू काळे, विशाल काळे, पापा शिंदे व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ढोकी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 109(1), 118(1), 118(2), 189, 189(2), 189(4), 190, 191(2), 191(3) व 352 अन्वये गुन्हा नोंदविला असून, या प्रकरणाचा पुढील तपास ढोकी पोलिसांकडून सुरू आहे.

या घटनेमुळे बुकनवाडी परिसरात खळबळ उडाली असून, घटनेतील सर्व आरोपींविरुद्ध पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>