/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अणदुर विभाग प्रमुख पदी बलभीम मनशेट्टी यांची निवड

Hot Posts

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अणदुर विभाग प्रमुख पदी बलभीम मनशेट्टी यांची निवड

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अणदुर विभाग प्रमुख पदी बलभीम  मनशेट्टी  यांची निवड 


चिवरी  : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या   अणदुर विभाग प्रमुख पदी तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील शिवसैनिक बलभीम राम मनशेट्टी   यांची फेरनिवड निवड करण्यात आली आहे. पक्षाचे विचार व कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रेरणेने तसेच धाराशिव जिल्ह्यातील पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे.

धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख श्री. सुनिलजी  काटमोरे , सहसंपर्कप्रमुख श्री. मकरंद ऊर्फ नंदुभैया राजेनिंबाळकर, जिल्हाप्रमुख तथा आमदार श्री. कैलासदादा पाटील आणि उपजिल्हाप्रमुख जि. प. सदस्य डॉ. जितेंद्र कानडे  यांच्यासह पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मनशेट्टी  यांच्यावर विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

शिवसेनेचे विचार, ध्येयधोरणे आणि पक्षाची भूमिका सर्वसामान्य जनतेपर्यंत तसेच घराघरांत पोहोचविण्यासाठी सक्रियपणे कार्य करण्याची अपेक्षा नियुक्तीपत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. पक्षसंघटना बळकट करणे, जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणे आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रात पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडणे, ही जबाबदारी नव्या विभाग प्रमुखावर राहणार आहे.

या नियुक्तीबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून,तसेच चिवरी  ग्रामस्थातून मनशेट्टी यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>