उस्मानाबाद/बालाघाट न्युज टाइम्स: निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रशासनाने ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील १६६ ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा फड लवकरच रंगणार आहे . राज्यातील विविध जिल्ह्यातील ७७५१ ग्रामपंचायतच्या सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १८ डिसेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून २० डिसेंबर २०२२ रोजी मतमोजणी होईल. अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस. मदन यांनी आज केली आहे. श्री मदन यांनी सांगितले की , ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी १८ नोव्हेंबर २०२२ रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची सूचना प्रसिद्ध करतील. नामनिर्देशन पत्र २८ नोव्हेंबर २०२२ ते २ डिसेंबर या कालावधीत दाखल करण्यात येतील, नामनिर्देशन पत्राची छाननी ५ डिसेंबर २०२२ रोजी होईल तर मतमोजणी २० डिसेंबर २०२२ रोजी होईल. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत असेल, तसेच त्याच दिवशी निवडणूक चिन्हाचे वाटप होईल. मतदान १८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेमध्ये मतदान होईल,व मतमोजणी २०डिसेंबर २०२२ रोजी होईल. ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील १६६ ग्रामपंचायत निवडणुक होणार आहे
यामध्ये जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील ४८, उस्मानाबाद तालुक्यातील ४५, कळंब तालुक्यातील ३०, भूम तालुक्यातील २, परंडा तालुक्यातील १, वाशी तालुक्यातील ४, लोहारा तालुक्यातील १३,तर उमरगा तालुक्यातील २३, ग्रामपंचायत निवडणुका १८ डिसेंबर २०२२रोजी होणार आहे तसेच २०डिसेंबर २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीचा फड लवकरच रंगात येणार असल्याचे स्पष्ट असून गाव पुढाऱ्यांनी देखील निवडणुकीच्या अनुषंगाने मोर्चे बांधणी सुरू केली आहे.
0 Comments