Hot Posts

6/recent/ticker-posts

यंदा जिल्ह्यात अति पावसाचा रब्बीच्या पेरणींना फटका, वीस दिवसांनी पेरणी लांबल्या

तुळजापुर /बालाघाट न्युज टाइम्स: यावर्षी उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाळा ऑक्टोंबर महिन्यापर्यंत लांबल्यामुळे रब्बीच्या पेरण्याही लांबल्या आहेत. जुलैपासून सततचा पाऊस सुरू असल्यामुळे जमिनीमध्ये कायम ओलावा निर्माण झाल्यामुळे पेरणीसाठी जमिनीची मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांना संधीच मिळाली नाही, त्यामुळे पेरण्यां यावर्षी जिल्ह्यात जवळपास २० दिवसांनी लांबल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईगडबडीने जमिनीची मशागत करून पेरण्या करण्यास सुरुवात केली आहे. यंदा जिल्ह्यात परतीच्या पावसानेही ऑक्टोबर अखेर पर्यंत मुक्काम वाढवल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिके काढण्यासाठी अडचण निर्माण केल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, त्याचबरोबर परतीच्या पावसाने मुक्काम वाढवल्याने त्याचा परिणाम रब्बी हंगामातील पेरण्यावर झाला आहे. 
रब्बीच्या पेरण्या जवळपास २० दिवसांनी लांबल्या असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे. दरवर्षी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात रब्बी हंगामातील पेरण्यांना सुरुवात केली जाते, मात्र यावर्षी अति पावसामुळे जमिनीची मशागत वेळेवर करता आली नसल्यामुळे पेरण्या लांबले आहेत. जिल्ह्यात ज्वारी , गहू, हरभरा, मका हे पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. यामध्ये ज्वारी पिकाची पेरणी लवकर करणे गरजेचे असते, त्यामुळे जवळपास २० दिवसाचा विलंब झाल्यामुळे ज्वारी उत्पादनात घट येण्याची शक्यता शेतकरी वर्गातून वर्तवली जात आहे,
 त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातून गहू हरभरा या पिकाकडून मोठ्या उत्पादनाची आशा आहे, यावर्षी जिल्ह्यात सर्वत्र पाण्याची प्रमाण जास्त झाल्यामुळे रब्बीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता  वर्तवली जात आहे.


Post a Comment

0 Comments