नळदुर्ग: तुळजापूर तालुक्यात मागील आठ दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने साठवण तलाव ,पाझर तलाव, मध्यम प्रकल्प ,नदी नाल्याच्या पाण्यामध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. जुलै ऑगस्ट मध्ये झालेल्या संतदार पावसाने व मागील आठ दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग मंडळातील २४ साठवण तलाव तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न मिटला असला तरी खरिपातील पिकांचे पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तुळजापूर तालुक्यातील आलीयाबाद साठवण तलाव, अणदुर साठवण तलाव, जळकोट, मुरटा, होर्टी, हंगरगा नळ ,सिंदगाव, सलगर मड्डी, लोहगाव, शहापूर, खुदावाडी, चिवरी, चिवरी उमरगा, देवशिंगा तूळ, वाणेगाव , वडगाव देव, सलगरा दिवटी ,किलज, निलेगाव, कुरनूर मध्यम प्रकल्प आदी साठवण तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत, तर येडोळा साठवण तलाव ८०% , होर्टी साठवण तलाव क्रमांक एक ९३% , नंदगाव साठवण तलाव ७८.३४%, कुन्सावळी साठवण तलाव ७२.२९%, केशेगाव साठवण तलाव ३८.४३% , चिवरी साठवण तलाव क्रमांक दोन ७६.४५% , फुलवाडी साठवण तलाव ३९.३१%, चिकुंद्रा साठवण तलाव,४३.२६% इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
0 Comments