![]() |
संग्रहित फोटो |
तुळजापुर: तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतीमध्ये रविवारी १८ डिसेंबर मध्ये मतदान होत आहे. गेले आठ दिवसापासून गावागावात प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू होती, प्रचाराची ती रणधुमाळी आज थंडावणार असूंन उमेदवार चोरी चोरी चुपके चुपके मतदाराच्या गाव भेटीवर भर दिला जात आहे. यंदा सरपंचपद जनतेतून निवड असल्यामुळे अनेक गावात चुरशीच्या निवडणुका होत आहेत , तालुक्यातील मोठ्या गावामध्ये दुरंगी ,तिरंगी, चौरंगी असे सामने रंगले लागले आहे. गेली आठ दिवसापासून उमेदवार प्रचार करण्यासाठी पॅनल प्रमुखासह गाव पिंजून काढली आहे. पुरुष उमेदवार चहा पाणी तर महिला उमेदवार हळदी कुंकवाचे आयोजन करून प्रचार करण्यावर भर दिला जात आहे. सोशल मीडियावर तर प्रचाराने धुमाकूळ घातला आहे , गल्लीबोळात बॅनर, पोस्टर व भोंग्याचा घोंगाट धुमधडाक्यात चालू आहे. तो प्रचार आज थंडावणार आहे. तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीमुळे गटातटाच्या राजकारणात ग्रामीण भाग माञ चांगलाच ढवळून निघाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
0 Comments