चिवरी: महिलांचा सण म्हणून मकर संक्रात ओळखला जात, असला तरी कालगणनेत याला विशेष महत्त्व आहे. यावर्षी अधिक मास असल्यामुळे हा सण एक दिवस समोर गेला असून हा सण १५ जानेवारीला साजरा करण्यात येणार आहे. मकर संक्रातीचा सण अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला असल्याने महिला वर्गांची वाणाचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात लगबग दिसून येत आहे. सध्या बाजारात सुगडे , ऊस ,हरभरा, बोर, गव्हाच्या लोंब्या, पेरू , वाटाण्याच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा आदींची दुकाने लागली आहेत. मकर संक्रात या सणाला वाण वाटणे, पतंग उडवणे आदी कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर पार पडतात. मकर संक्रात तर रथसप्तमीपर्यंत महिला वर्ग हळदीकुंकवाचा कार्यक्रम साजरी करतात. यामध्ये महिला एकमेकींना काही भेटवस्तू आदान प्रदान करण्यात येते. त्यामुळे सणाच्या दोन-तीन दिवस अगोदरपासूनच महिलावर्ग वाणाच्या साहित्याची खरेदी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे व्यावसायिकांनीही आपली दुकाने सजवून ठेवली आहेत. तर रस्त्याच्या कडेला सुगडेची दुकान लागलेली आहेत, आता सुगड्यामध्येही विविध आलेली दिसून येत आहे. काही ठिकाणी सुगड्यावर कलाकुसर व सजावटही केलेली आढळून येत आहे. या सुगड्यात ऊस,बोर,हलवा, ज्वारीचे कणीस , गव्हाच्या लोंब्या, तीळ ,गुळ ,आदी साहित्य खरेदी सुवांसिनीची लगबग दिसुन येत आहे.
0 Comments