Hot Posts

6/recent/ticker-posts

विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा व परिसरातील नूतन सरपंचाचा सन्मान सोहळाही संपन्न होणार


चिवरी (राजगुरू साखरे):-  इटकळ ग्रामीण पत्रकार संघ व शंभूराजे बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने  गेल्या दहा वर्षापासून इटकळ ग्रामीण पत्रकार संघाची दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येत आहे याही 2023 वर्षाची दिनदर्शिका  व परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा व नुकत्याच झालेल्या लोकनियुक्त सरपंचाचा सन्मान सोहळा येत्या रविवार 8 जानेवारी रोजी सायंकाळी  पाच वाजता विवांता रिसॉर्ट इटकळ येथे आयोजित करण्यात आला आहे 

या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून लोकप्रिय खासदार ओमप्रकाश निंबाळकर व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य अझर मुजावर हे लाभणार आहेत त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील  , कंचेश्वर शुगरचे चेयरमन धनंजय भोसले ,  जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे ,  माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव वडगावे , दैनिक तरुण भारत जिल्हा प्रतिनिधी देविदास पाठक , शेंडगे हॉस्पिटल उमरगाचे डॉक्टर राजाराम शेंडगे , नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे  , बालाघाट महाविद्यालयाचे उपप्राचार्य रामदास ढोकळे ,  शिक्षण विस्तार अधिकारी तात्यासाहेब माळी , विवांता  रिसॉर्टचे विवेक देवसानी ,  ई न्यूज मराठीच्या संपादिका किरण चौधरी यांची उपस्थिती लाभणार आहे या दिमाखदार सोहळ्यासाठी परिसरातील सामाजिक ,  शैक्षणिक , राजकीय  , वारकरी , शेती  , उद्योग , व्यापार व जागरूक नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष दिनेश सलगरे ,  उपाध्यक्ष लियाकत खुदादे , सचिव केशव गायकवाड , सदस्य चांदसाहेब शेख  , बालाजी गायकवाड , नामदेव गायकवाड  यांनी केले आहे.

_____________________

Post a Comment

0 Comments