नळदुर्ग: महाराष्ट्रसह, कर्नाटक ,आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यातील लाखो भक्ताचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूर तालुक्यातील मैलारपूर (नळदुर्ग ) येथील श्री खंडोबाची महायात्रा दि,५ पासून प्रारंभ होत आहे, यात्रेच्या अनुषंगाने नळदुर्ग नगरपालिका, पोलीस प्रशासन, मंदिर संस्थांकडून यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंदिर परिसरात मागील दोन-तीन दिवसापासूनच नारळाचे दुकाने , पेढे विक्रेते, रसवंती ग्रह , लहान मुलांची खेळणी दुकाने, आदी व्यवसायिकांनी दुकाने थाटली आहेत, यामुळे मंदिर परिसर गजबजून गेला आहे. यात्रेचा ६ जानेवारी मुख्य दिवस असुन दि,७ रोजी जंगी कुस्त्याच्या स्पर्धा होऊन यात्रेची सांगता होणार आहे .
मागील दोन वर्षापासून येथील यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्या होत्या यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे निर्बंध मुक्त यात्रा होत असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
![]() |
श्री क्षेञ खंडोबा मंदिराकडे जाण्यासाठी मार्ग |
0 Comments