तुळजापुर: तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील जिल्हा परिषद शाळेतील परिचर या पदावरून आपली ३६ वर्षाची बिनतक्रार सेवा बजावून रमेश हरिहरराव पाटील हे नियत वयोमानानुसार ५८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्त झाल्याप्रित्यर्थ प्रशालेच्यावतीने मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, फेटा, पुष्पहार, पुष्पगुच्छ, श्रीफळ भेट देऊन सपत्नीक यथोचित भावस्पर्शी सत्कार करून निरोप देण्यात आला. श्री रमेश पाटिल हे तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील जिल्हा परिषद प्रशालेतील परिचर या पदावर आपली ३६ वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्त झाले,श्री .रमेश पाटील यांच्या मितभाषी स्वभावाने सर्वांमध्ये मिळून मिसळून काम करणे, कोणालाही न दुखावणे असे अजातशत्रू व्यक्तिमत्व असल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते. यावेळी सेनेचे कृष्णाथ मोरे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष बसवराज कवठे, पत्रकार संजय रेणुके यांनी आपल्या भावना मनोगतातुन व्यक्त केल्या .याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष माळगे, काँग्रेसचे उस्मानाबाद जिल्हा युवा उपाध्यक्ष श्रीनिवास अशोकराव पाटील, विश्वास भोगे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष खंडू चंदे, प्रभारी मुख्याध्यापक सारणे, सहशिक्षक प्रदीप तरमोडे, वैभव पटवारी, शिंदे, सौ. पुष्पलता कांबळे, माजी सैनिक संजय स्वामी, हरीश पाटील, योगेश पाटील, इयत्ता पाचवी ते दहावीचे विद्यार्थी व विद्यार्थिनी, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
0 Comments