उस्मानाबाद: उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृहात आधुनिक लहुजी सेना कार्यकारणीची महत्त्वपूर्ण बैठक दि,१ जानेवारी २०२३ रोजी संपन्न झाली.या बैठकीमध्ये आधुनिक लहुजी सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्षा आदरणीयास नगीनाताई सोमनाथ कांबळे तसेच राज्य प्रवक्ते लक्ष्मण क्षीरसागर यांच्या हस्ते सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक २०२२ मध्ये जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेल्या सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सर्वप्रथम नगिनाताई सोमनाथ कांबळे यांनी दुसऱ्यांदा काटगाव ग्रामपंचायत वरती विजय मिळवल्याबद्दल त्यांचा उस्मानाबाद जिल्ह्याच्या वतीने सत्कार कोरण्यात आला ,तसेच केशेगाव उपसरपंच पदी राज्य प्रवक्ते लक्ष्मण क्षीरसागर, यांनीही मोठा विजय मिळवल्याबद्दल त्यांचाही उस्मानाबाद जिल्ह्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे समुद्रवाणी ग्रामपंचायत मध्ये विजय उमेदवार महिला सरपंच सौ मीरा संतोष हणमंते, आरळी ग्रामपंचायत विजय उमेदवार सरपंच पदी अजय सगट , आपसिंगा ग्रामपंचायत सरपंच पदी विजय उमेदवार अजित शिरसागर , खानापूर ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ . मनीषा मगर, करजखेडा ग्रामपंचायत सदस्य पदी सौ. अलका कांबळे, बालाजी सुरवसे, यासंह आदी ठिकाणाहून विजय झालेल्या उमेदवारांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यानंतर आधुनिक लहुजी सेना महाराष्ट्र राज्य नवीन नियुक्ती देण्यात आल्या यामध्ये सोलापूर जिल्हा माळशिरस तालुका युवक अध्यक्षपदी अर्जुन देडे यांची नियुक्ती करण्यात आली,तर उस्मानाबाद जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्ष म्हणून अलका कांबळे यांची निवड करण्यात आली. तसेच या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यात मातंग समाजावर होत असलेले अन्याय अत्याचार याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.उस्मानाबाद जिल्हा संघटनेचभविष्य काळातील रणनिती या विषयावर सविस्तर अशी चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर मातंग समाजाचे जिल्ह्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचा सत्कार समारंभ *संस्थापक अध्यक्षा आदरणीय नगिनाताई सोमनाथ कांबळे यांनी उपस्थितांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करून सर्वांना भविष्यातील अडचणी सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे अशी हमी दिली. तसेच कार्यक्रमास उपस्थित असणारे राज्याचे राज्य प्रवक्ते लक्ष्मण क्षीरसागर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी या कार्यक्रमास आधुनिक लहुजी सेना ,
महिला आघाडी अध्यक्ष तुळसाताई बनसोडे, उस्मानाबाद महिला आघाडी जिल्हा सचिव मायाताई कांबळे,उस्मानाबाद युवक आघाडी जिल्हा अध्यक्ष महेश देडे जिल्हा उपाध्यक्ष बाळू देडे, जिल्हा सचिव संतोष हणमंते, जिल्हा संघटक कुंडलिक भोहाळ, संपर्क प्रमुख विजय कांबळे, तुळजापूर महिला आघाडी तालुका अध्यक्ष आरतीताई लोंढे, तुळजापूर तालुका सचिव वंदनाताई ,बार्शीचे तालुकाध्यक्ष रवींद्र पौळ ,तुळजापूर तालुका अध्यक्ष रामजी गायकवाड, उस्मानाबाद युवक तालुकाध्यक्ष शंकर कांबळे, दत्ता पेठे, स्वप्निल देडे, आदीसह आधुनिक लहुजी सेना उस्मानाबाद जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होत.
0 Comments