नाईचाकूर प्रतिनिधी: उमरगा तालुक्यातील नाईचाकूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून जि. प. माध्यमिक नाईचाकूरच्या विद्यार्थ्यांनी खरी कमाई अथवा कमवा व शिका या संकल्पने अंतर्गत पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केले पदार्थ विक्रीसाठी ठेवला होते, विद्यार्थ्यांनी व पालकांनी आपल्या पाल्याने बनवलेले चविष्ट पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. प्रशालेचे मुख्याध्यापक लक्ष्मण चव्हाण यांच्या संकल्पनेतून शालेय जीवनापासूनच कमवायची आवड निर्माण व्हावी यासाठी विद्यार्थ्यांना आपण स्वतः खाद्यपदार्थ बनवून आणा व शाळेत स्टॉल लावा अशी संकल्पना मांडली सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या घरातून विविध प्रकारचे चवदार पदार्थ बनवून शाळेच्या प्रांगणात स्टॉल लावला होते, या स्टॉलवर शिक्षक पालक विद्यार्थ्यांनी एकच गर्दी करून आपल्याच मित्राने आपल्याच मैत्रिणीने बनवलेल्या पदार्थाच्या आस्वाद घेण्यासाठी झुंबड उडाली होती. कसाबच्या सञात शालेय शिक्षण समिती अध्यक्ष सतीश बाबुराव पवार यांचे हस्ते स्टॉलचे उद्घाटन झाले यानंतर विद्यार्थ्यांनी तयार करून आणलेल्या पदार्थाची विक्री सुरुवात झाली. विद्यार्थ्यांना विचारणा केली असता विद्यार्थ्यांनी आम्ही सर्वप्रथमच स्वतःच्या हाताने बनवून पदार्थ विक्रीसाठी ठेवला आहे तो विक्रीसाठी ठेवलेला माल विकल्यानंतर आम्हाला चार पैसे भेटले ते पैसे भेटल्यानंतर आम्हाला आज खूप आनंद झाला ,पहिल्यांदाच आम्ही चार पैसे कमीवलो याचा आम्हाला आनंद आहे सर्वांनाच नोकरी लागणार नाही त्यामुळे काहींनी व्यवसाय केला पाहिजे काहींनी नोकरी केली पाहिजे ,काहींनी व्यवसाय केला पाहिजे त्याचाच भाग म्हणून आम्ही मित्र-मैत्रिणींनी स्टॉल लावला होता ह्या स्टॉलवर विद्यार्थ्यांनी व पालकांनी आम्ही तयार केलेला पदार्थाची खरेदी केली आम्हाला त्यातून चार पैसे भेटले व्यवसाय कसा करायचा हे आम्हाला थोडफार शालेय जीवनापासूनच कळाले .
0 Comments