Hot Posts

6/recent/ticker-posts

दिनदर्शिका प्रकाशन व पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न इटकळ व परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १८ मान्यवरांचा मानपत्र देऊन करण्यात आला सन्मान


तुळजापुर:- तालुक्यातील इटकळ येथे दि,८ रोजी ईटकळ ग्रामीण पत्रकार संघाचे दिनदर्शिका प्रकाशन व पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी इटकळ ग्रामीण पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद असुन त्यांच्या सकारात्मक लिखाणामुळेच ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने विकास होत असल्याचे मत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास दादा पाटील यांनी दिनदर्शिकेच्या  प्रकाशन व पुरस्कार सोहळा प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

रविवार दि ८ जानेवारी रोजी सायंकाळी इटकळ येथील विवांता रिसॉर्ट येथे दिनदर्शिका प्रकाशन व पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

या दिनदर्शिका प्रकाशन व पुरस्कार सोहळा कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार   कैलास पाटील हे होते तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य अझर मुजावर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे , दैनिक तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी देविदास पाठक , शेंडगे हॉस्पिटलचे डॉ.राजाराम शेंडगे ,नळदुर्ग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे , बालाघाट महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.रामदास ढोकळे ,  यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांचा पत्रकार संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दयानंद काळुंके यांनी केले ग्रामीण पत्रकार संघाचे कार्य व समस्या याविषयी माहिती दिली.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते इटकळ ग्रामीण पत्रकार संघ २०२३ च्या दिनदर्शिकेचे मोठया थाटात प्रकाशन करण्यात आले.त्यानंतर इटकळ व परिसरातील आदर्श शिक्षक ; कृषिभूषण; युवा उद्योजक; महीला उद्योजक ; आदर्श पालक आदी १८ जणांना आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते  सन्मानपत्र ; शाल ; पेन ; स्वामी विवेकानंद पुस्तिका ; पुष्प गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

 इटकळ व परिसरातील नूतन सरपंच व उपसरपंच यांचा ही आ. कैलास पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे,  मुख्याध्यापक नागनाथ जळकोटे,दैनिक तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी देविदास पाठक यांनी मनोगत व्यक्त करतांना इटकळ ग्रामीण पत्रकार संघाच्या सामाजिक कार्याचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या.या दिमाखदार सोहळ्यासाठी परिसरातील सामाजिक , शैक्षणिक , राजकीय , वारकरी , शेतकरी , व्यापारी , अणदूर येथील जय मल्हार पत्रकार संघाचे सर्व पत्रकार बांधव व इटकळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दिनेश सलगरे यांनी केले तर आभार बालाजी गायकवाड यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी इटकळ ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश सलगरे ,  उपाध्यक्ष लियाकत खुदादे , सचिव केशव गायकवाड , सदस्य चांदसाहेब शेख  , बालाजी गायकवाड , नामदेव गायकवाड  यांनी परिश्रम घेतले.


Post a Comment

0 Comments