Hot Posts

6/recent/ticker-posts

येवती येथील विद्यार्थिनी कु. अनुराधा लवटे विभागात प्रथम


 तुळजापुर : तुळजापूर तालुक्यातील येवती येथील माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु. अनुराधा अनिल लवटे याने उस्मानाबाद येथे दि.९ रोजी झालेल्या विभागीय स्तरीय आंतरशालेय स्पर्धेत १७ वर्ष वयोगटातील ४०० मीटर  मुलींच्या धावणे या क्रीडा प्रकारात विभागातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.कु. लवटे यांची पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल अणदूरचे सरपंच आदरणीय रामदादा आलुरे, लक्ष्मीकांत पाटील साहेब , विद्यालयाचे मुख्याध्यापक जगताप सर, सरपंच अमोल गवळी, प्रीतम गायकवाड , अनिल शिंदे , उमाकांत गवळी, नितीन गायकवाड, राष्ट्रवादी तालुका युवक उपाध्यक्ष समाधान ढोले आदीसह शिक्षक वृंद, ग्रामस्थातून अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments