चिवरी: तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी देवीजींना सोलापूर येथील भाविक आशिष शाम राठोड , दिव्या शाम राठोड यांनी पावणे पाच किलो चांदीचे सिंहासन अर्पण केले आहे. तसेच तुळजापूर येथील भाविक विष्णू माने यांच्याकडून संपूर्ण मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली आहे, या दोन्ही भाविकांचा पुजारी मंडळाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला, यावेळी पुजारी मंडळाचे संभाजी काळजाते, जगन्नाथ काळजाते, शिवानंद काळजाते आदीसह पुजारी मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होत.
0 Comments