इटकळ : आई वडीलांच्या जिद्दीचे फळ मौजे बाभळगाव येथील अश्वीनी कसबे यांना पी.एच.डी.Trending News

Hot Posts

6/recent/ticker-posts

इटकळ : आई वडीलांच्या जिद्दीचे फळ मौजे बाभळगाव येथील अश्वीनी कसबे यांना पी.एच.डी.Trending News

इटकळ : आई वडीलांच्या जिद्दीचे फळ मौजे बाभळगाव येथील अश्वीनी कसबे यांना पी.एच.डी.Trending News 


------------------------------------------ 


इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापूर तालुक्यातील मौजे बाभळगाव येथील कन्या अश्विनी महादेव कसबे यांनी पिएचडी मिळवून कुटुंबाचा मान उंचावला आहे.आजही अनेक ठिकाणी मुलगी जन्माला आली की कपाळावर आठ्या पडतात. मात्र अशा विचारांना छेद देत पाचही मुलींना उच्च शिक्षण देणारे आई-वडील समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहेत. प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत अश्विनी कसबे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथून बायो केमिकल ॲन्ड इन विट्रो स्टडीज या विषयावर पीएचडी पदवी मिळवत कुटुंबासह परिसराचा मान उंचावला आहे.

अत्यंत साध्या कुटुंबातील अश्विनी कसबे यांनी शिक्षणाच्या जोरावर यशाचा हा मानाचा टप्पा गाठला. आर्थिक व सामाजिक अडचणी असतानाही त्यांच्या आई-वडिलांनी मुलींना शिक्षण देण्याचा निर्धार सोडला नाही. पाचही मुलींना उच्च शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी मोठ्या जिद्दीने प्रयत्न केले.बि एस सी शिक्षण उमरगा येथे तर एम एस सी चे शिक्षण डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पुर्ण केले आहे त्यानंतर  आज अश्विनी कसबे यांनी पीएचडी मिळवत आपल्या कुटुंबाचा आणि गावाचा अभिमान वाढविला आहे.

“मुलगी म्हणजे ओझे नसून ती कुटुंबाचा आणि समाजाचा आधार बनू शकते,” हे अश्विनी कसबे यांच्या यशातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.त्यांना डॉ विकास शेंडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे 

त्यांच्या या यशाबद्दल बाभळगाव , इटकळ परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. समाजातील पालकांनी मुलींना शिक्षणाची संधी दिल्यास त्या मोठी कामगिरी करू शकतात, याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणून या यशाकडे पाहिले जात आहे.

Post a Comment

0 Comments