चिवरी : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील दत्तू पाटील आण्णा माध्यमिक विद्यालयात दि,२४ रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापीका एल.के. बिराजदार तर प्रमुख पाहुणे दयानंद महाविद्यालय सोलापूर येथील प्रशासक उबाळे,प्रा.कुभांरे ,प्रा. मुळीक,संस्थेचे संस्थापक पोपटराव पाटील ,लक्ष्मण लबडे,शंकर बिराजदार ,माजी सैनिक विठ्ठल होगाडे,यांची प्रमुख उपस्थिति होती. या कार्यक्रमप्रसंगी विविध स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपञ व बक्षीस वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक शहाजी मस्के यांनी केले तर आभार प्रमुख वक्ते श्री. उबाळे सर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
0 Comments