Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकप्रिय खासदारांच्या यादीत सुप्रियाताई सुळे देशात नंबर वन


पुणे: देशातील टॉप टेन खासदाराच्या यादीत महाराष्ट्रातील बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पुन्हा एकदा नंबर वनचा किताब पटकाविला आहे. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनापर्यंत सर्वोत्तम कामगिरी केलेल्या खासदारांची यादी जाहीर करण्यात आली आहे, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे देशातून अव्वल ठरले आहेत. त्याचबरोबर याच राज्यातील आणखी तीन खासदाराचा या यादीमध्ये समावेश झाला आहे. यामध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे, आणि राहुल शेवाळेंचा समावेश आहे. यामध्ये श्रीरंग बारणे यांनी दुसरा तर श्रीकांत शिंदे यांनी आठवा आणि राहुल शेवाळे नववा क्रमांक पटकाविला आहे. यावरून इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र राज्यातील जास्त खासदाराचा समावेश आहे. त्यामुळे यावरून महाराष्ट्रातील खासदारांचा लोकसभेत दबदबा असल्याचे दिसून येते.


Post a Comment

0 Comments