तुळजापुर : तालुक्यातील कुंभारी येथील एका महिलेसह तिच्या दोन लेकरांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना शुक्रवारी दुपारी (दि,२४) रोजी दोन वाजण्याच्या सुमारास कुंभारी शिवारात उघडकीस आली आहे, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेल्यानंतर पाय घसरून पाण्यात बुडाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की तुळजापूर तालुक्यातील कुंभारी येथील भाग्यश्री बाबुराव तांबे (वय ४०) या आईसह मुलगा समर्थ (वय १०)व मुलगी दुर्वा (वय ८) यांची शाळा सुटल्यानंतर कुंभारी शिवारातील स्वतःच्या शेताकडे मयत भाग्यश्री तांबे आपल्या दोन लेकरासह शेतात गेले होत्या. दरम्यान दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सुशांत स्वामी हे पाणी आणण्यासाठी आदेश स्वामी यांच्या विहिरीवर गेले होते यावेळी तिघा माय लेकरांचा स्वामी यांना मृतदेह पाण्यामध्ये आढळून आला. यावेळी त्यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना या घटनेची माहिती दिल्यानंतर सर्वांनी विहिरीकडे धाव घेतली या घटनेची माहिती सर्वत्र गावामध्ये पसरल्याने ग्रामस्थांनी स्वामी यांच्या विहिरीकडे एकच गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळताच तुळजापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक सुशील कुमार चव्हाण, विठ्ठल चासकर, कर्मचारी वैभव देशमुख, गणेश माळी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढून घटनास्थळाचा पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
मागील सहा वर्षांपूर्वी मयत भाग्यश्री तांबे यांचे पती कॅन्सर आजाराने मृत्युमुखी पडले आहेत, त्यामुळे सासू एक मुलगा दोन मुलगी यांची जबाबदारी मयत भाग्यश्री तांबे यांच्यावर होती .यामध्ये अगोदरच एका मुलीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. यातच घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
0 Comments