Hot Posts

6/recent/ticker-posts

उद्या तुळजापुर नगरीत होणार चित्ररथाचे प्रदर्शन


तुळजापुर :- प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे कर्तव्यपथावर झालेल्या संचलन सोहळ्यात महाराष्ट्र शासनाचा सहभाग अत्यंत नेत्रदीपक ठरला. महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठे नारिशक्ती या चित्ररथाने सर्व उपस्थितांची आणि हा सोहळा दूरवर पाहणाऱ्या जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकत सर्वोत्कृष्ट सादरीकरणाचा व्दितीय क्रमांक प्राप्त केला. या चित्ररथाचे महाराष्ट्रात सर्व स्तरातून कौतुक होत आहे. साडेतीन शक्तीपीठावर आधारित चित्ररथाचे प्रदर्शन तुळजापूर येथे होणार असून या तुळजापूर शक्तीपीठाच्या चित्ररथाचा सांस्कृतिक कार्यक्रम शनिवार दि. ४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता छ.संभाजी महाराज उद्यान तुळजापूर येथे होणार असल्याचे संचालक,  सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांनी कळविले आहे.

 चित्ररथाचा देखावा महाराष्ट्रातील साडतीन शक्तीपीठांना भेट देणाऱ्या भाविकांना, सर्वसामान्यांना पाहता येण्यासाठी चित्ररथाचे  प्रदर्शन हे तुळजापूर येथे होणार आहे. 

  चित्ररथाचे मार्गक्रमण याप्रमाणे- छ.संभाजी महाराज उद्यान  ते भवानी माता मंदिर परीसर (सकाळी ११ ते १२ वा.),  असा आहे. सर्व नागरीकांनी व भावीकांनी या चित्ररथाच्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments