तुळजापुर - तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा (तुळ) येथील रहिवाशी आणि सद्या पुणे येथील सी ओ ई पी तंत्रज्ञान विद्यापीठ येथे निदेशक पदावर कार्यरत असलेले कर्मचारी श्री. भगवान बापूराव जाधव यांची महाराष्ट्र शासनाच्या बुद्धिबळ संघाचा कर्णधार म्हणून निवड झाली आहे, केंद्र शासन आणि ओडिसा राज्य शासन यांच्या विध्यमानाने भुवनेश्वर, ओडिसा येथे आयोजित करण्यात आलेल्या आखिल भारतीय नागरी सेवा बुद्धिबळ स्पर्धा २०२२-२०२३ या दिनांक ११ मार्च ते १९ मार्च २०२३ या कालावधीत होणार आहेत या स्पर्धेत भाग घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या संघाची निवड चाचणी दि.१ व २ मार्च २०२३ रोजी सचिवालय जिमखाना मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती, यामध्ये श्री. भगवान जाधव यांची निवड झाली असून महाराष्ट्र शासनाच्या बुद्धिबळ संघांचे कर्णधार म्हणून निवड झाली आहे,अंजनी प्रशाला नळदुर्ग चा हा माजी विध्यार्थी आहे.जाधव यांच्या निवडी बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
0 Comments