तुळजापुर :तुळजापुर तालुक्यातील उमरगा चिवरी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दि,८ रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. उमरगा चिवरी ग्रामपंचायत अंतर्गत आशाताई अनिता शिवाजी भोसले तसेच गावातील विविध बचत गटाचे अध्यक्षांचा ,ग्रामपंचायत सदस्यांचाही महिला दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच सर्वेश्वर सुभाष पाटील ,उपसरपंच महंमद काशिम पिंजारी, ग्रामपंचायत सदस्य महादेव सुरेश वडजे, विजय सावंत, लक्ष्मी चाफे तलाठी डी.एन.गायकवाड, ग्रामसेवक गोरोबा गायकवाड, ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार महिला ग्रामसभा व शपथ घेण्यात आले महिला दिनाचे औचित्य साधून गावातील सर्व कुटुंबाचे घरपट्टी नळपट्टी वसुली करण्यात आले या कार्यक्रमाचेे आभार ग्रामसेवक गोरोबा गायकवाड यांनी मानले.
0 Comments