चिवरी:मागील चार दिवसापासून ढगाळ वातावरणासह अवकाळी पाऊस होईल असा अंदाज हवामान विभाग व सोशल माध्यमातून वर्तविला जात आहे. त्यामुळे हाता तोंडाशी आलेले रब्बी हंगामातील घास हिरावून नेऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी रब्बीच्या काढणीला वेग दिला आहे. मात्र तुळजापूर तालुक्यातील चिवरी, येवती, आरळी,बसवंतवाडी आदीसह परिसरात सोमवारी दि, ६ रोजी रात्री सुटलेल्या सोसायटीच्या वाऱ्यामुळे रब्बी हंगामातील पिके भुईसपाट झाली आहेत. यामध्ये ज्वारी, हरभरा गहु,मका पिकांचे नुकसान झाले आहे. ढगाळ वातावरण, पाऊस व गारपीटीच्या अंदाजामुळे शेतकऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काढणी झालेल्या पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. आधीच सोयाबीनला भाव नसल्याने घरात सोयाबीन साठवून ठेवलेला बळीराजा चिंतेत असताना शेतकऱ्याच्या मानगुटीवर आसमानी संकट आवासून उभे असल्याने शेतकऱ्याची कोंडी निसर्गाकडून केल्याचे चित्र दिसत आहे.
माझ्या दोन एकर क्षेत्रावर ज्वारी लागवड केली असून सोमवारी अचानक सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पूर्ण ज्वारी पिक आडवे पडले आहे, त्यातच पाऊस झाला तर हाती काहीच होणार नाही रब्यातील संपूर्ण पिके आडवी झाली आहेत त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष द्यावे.
0 Comments