Hot Posts

6/recent/ticker-posts

कृषि विभाग विविध योजनातून नातेपुते मंडळ मधील २६ गावातील ९९७ लाभार्थीना डीबीटी ने १ कोटी पेक्षा जास्त अनुदानाचा लाभ - सतिश कचरे मंडळ कृषि अधिकारी |997 beneficiaries of 26 villages in Natepute Mandal through various schemes of Agriculture Department benefited by DBT more than 1 crore subsidy! - Satish Waste Management Agriculture Officer

 कृषि विभाग विविध योजनातून नातेपुते मंडळ मधील २६ गावातील ९९७ लाभार्थीना डीबीटीने १ कोटी पेक्षा जास्त अनुदानाचा लाभ  - सतिश कचरे मंडळ कृषि अधिकारी !



 नातेपुते /प्रतिनिधी: स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवात महाराष्ट्र शासन कृषि विभाग , मंडळ कृषि अधिकारी , नातेपुते कार्यालय कार्यक्षेत्रातील २६ गावामधील ९९७ वैयक्तिक लाभार्थीना कृषि विभाग विविध योजनामधून डीबीटी ने १ कोटी पेक्षा जास्त अनुदान आर्थिक वर्षे २०२२ २३ मध्ये वरीष्ठ स्तरावरून शिफारसी व योजना मार्गदर्शक सुचनास आधिन राहून वितरीत करण्यात आले आहे . 

यामध्ये २६ गावातील ९८ लाभार्थीना ७५ हे क्षेत्रासाठी प्रधानमंत्री सुक्ष्म सिचन योजनेतून १० .२३ लाख डिबीटीने वितरीत करण्यात आले असून ७ लाख वितरणाच्या कार्यपद्धती मध्ये आहे. महाडीबीटी अंतर्गत यांत्रीकरण सर्व योजना चॉफ कटर , ट्रॅक्टर ऑपरेटेड स्प्रे पंप , कांदा चाळ , पेरणी यंत्र , नांगर , रोटाव्हेटर , टॅक्टर , मळणी मशीन इत्यादीसाठी १३४ लाभार्थीना ६६.३० लाख डीबीटीने वर्ग करण्यात आले आहे व ३९ लाख वितरणाच्या कार्यपद्धतीत आहे. शेततळे अस्तरीकरण साठी ३ गावातील ५ लाभार्थीना ३ .५० लाख मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना अंतर्गत तालुक्यातील पहीले शेततळे खोदाई मौजे पिपरीतील लाभार्थीला ७५ हजार डीबीटीने वर्ग करण्यात आले आहे. अनुदान वितरणामध्ये कमीत कमी ३५०० हजार पासून जास्तीत जास्त ८ लाख खातेवर वर्ग करण्यात आले आहे . याचबरोबर मका , ज्वारी , हरभरा पीक स्पर्धा मध्ये मंडळ कार्यक्षेत्रातील २६ गावामधील १४ शेतकरी स्पर्धकांनी पुणे विभाग स्तर, जिल्हा स्तर , तालुका स्तर मध्ये पीक स्पर्धा विजेते पद पटकवून प्रथम ३ क्रमांक पटकावून ३हजार ते १५ हजार रुपयांचे बक्षिशे मिळविली आहेत व मडळ कार्यालय ISO 9001:2015 ची मान उंचविली आहे. 

या वैयाक्तीक योजना बरोबरच कार्य क्षेत्रातील १७ गावात शास्त्रज्ञ भेट , शिवार प्रक्षेत्र भेट ' २६ गावात खरिप व रब्बी हंगाम पूर्व प्रशिक्षण . बीज प्रक्रिया मोहीम , ऊस खोडवा व पाचट व्यवस्थापन - ५६० हे, मका लष्करी अळी नियंत्रण ' १० % रा. खत बचत मोहीम , बियाणे खरेदी वेळी घ्यावयाची काळजी , किटकनाशके फवारणी वेळी घ्यावयाची काळजी , डाळीब GI मानांकन उपक्रम , भाजीपाला फळे व औषधी सुंगधी वनस्पती निर्यात सहभाग नोंदणी मोहीम , ऊस हुमणी अळी नियंत्रण मोहीम ' लाईट ट्रॅप मोहीम ' डाळीब पीन होल बोरर नियंत्रण मोहीम , समाजीक समावेशन सत्ताह ' माझा एक दिवस बळीराज्यासाठी मोहीम , अनुसुचित जाती जमाती शेतकरी सहभाग वाढविणे मोहीम ' शेतीशाळा ६ गावे ४ पिके १८० लामार्थी , चर्चासत्र ,शेतकरी प्रशिक्षणे मेळावे ' निर्यातक्षम भाजीपाला उत्पादन ६ गावे ४० हे भेडी व मधुमक्का प्रचार , महाला गांधी फळबाग लागवड १८ ला मार्थी १८ .१० हे लागवड ' शेतकरी मासिक वर्गणी १२० वर्गणीदार, प्रधानमंत्री सुक्ष्म अन प्रक्रिया उदयोग प्रशिक्षण व१०० अर्ज ' कोरडवाहू शेती क्षेत्र विकास प्रकल्प २गावे १२लाख खर्च १०० लाभार्थी सहभाग, शेतकरी अभ्यास दौरे -२ -३० लाभार्थी , गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा ६ लाभार्थी १२ लाख विमा डीबीटीने वितरण ' किसान क्रिडीट कार्ड सहभाग मोहीम 'महाडीबीटी सहभाग प्रचार ,प्रसार व प्रसिद्धी मोहीम , बियाणे उगवन क्षमता तपासणी कार्यक्रम, क्रॉपसॅप अंतर्गत मका, ज्वारी, उस , हरभरा किड व रोग सव्हैक्षण २६ गावे १६४ प्लॉट निरीक्षणे , हॉटशॉप अंतर्गत डाळीब कीड व रोग सव्हेक्षण निरीक्षणे २६ प्लॉट प्रति आठवडा, ऑर्चड मॅपिग , ई पीक पहाणी प्रचार मोहीम , हरभरा - २ प्रकल्प २ हे , गण्हू १ प्रकल्प १० हे, बाजरी १५ प्रकल्प -१५० हे 'प्रकल्प व विस्तार कार्यक्रम राबविण्या आले आहेत , हरभरा , ज्वारी प्रमाणित बियाणे वाटप २० क्वि   मुलस्थानी जलसंधारण मोहीम , वनराई बंधारे मोहीम , आंतराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षे प्रशिक्षण तृणधान्य दिवस प्रचार प्रसिद्धी कार्यक्रम, मृद व जलसंधारण उपाययोजना अंतर्गत जमीन सुधारणा कार्यक्रम , विविध पीक , विषय पीक प्रशिक्षण इत्यादीचे नियोजन व आयोजन करून अधिनस्त सर्व अधिकारी कर्मचारी प्रत्येक गावात तळागाळातील लाभार्थी पर्यत पोहचून योजनांचा लाभ दिला आहे. 

कार्यालियाने कृषि व सलग्न विभागाच्या विविध योजनांची प्रचार, प्रसार, प्रसिद्धी , सहभाग, लाभ देऊन आर्थिक वर्ष यशस्वी रित्या उत्कृष्ट कामाने पार पाडल्याने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कार्यक्षेत्रातील लाभार्थी व शेतकरी समाधान व्यक्त करून अधिकारी कर्मचारी यांना शब्बासकिची थाप देऊन , वाहवा  करून अधिकारी कर्मचारी यांचा उत्साह द्विगुणीत करत आहेत.


Post a Comment

0 Comments