नातेपुते येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी|Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar's birth anniversary was celebrated with enthusiasm.
१४ दिवस चाललेल्या कार्यक्रमाची भव्य मिरवणुकीने झाली सांगता
नातेपुते विविध ठिकाणी भीमजयंती उत्साहात साजरी
नातेपुते प्रतिनिधी : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती नातेपुते येथे विविध ठिकाणी अत्यंत उत्साहात साजरी झाली. जयंती महोत्सव समितीच्या वतीने दि.१ एप्रिल पासून १४ एप्रिल पर्यंत विविध उपक्रम राबविण्यात आले होते.
यामध्ये पत्रकार सन्मान, फनी गेम,पाककला स्पर्धा,भिमगितांचा कार्यक्रम,विविध वक्त्यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम, डॉ.आंबेडकर यांचा वीस फुटी भव्य पुतळा देखावा असे विविध उपक्रम होते. १४ एप्रिल रोजी जयंती समितीच्या वतीने सकाळी दहा वाजता अभिवादन सभा प्रारंभ झाली यावेळी नातेपुते पोलिस स्टेशन चे सहा पोलिस निरीक्षक प्रवीण सपांगे यांचे हस्ते प्रथम पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर ज्येष्ठ बौद्धाचार्य समीर सोरटे व प्रकाश साळवे यांचे कडून बुद्धवंदना घेण्यात आली.
अभिवादन सभेत बोलताना आमदार राम सातपुते म्हणाले की समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत न्याय मिळावा अशा पद्धतीने राज्य घटनेची निर्मिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली आहे.जगाला हेवा वाटावा अशी राज्य घटना बाबासाहेबांनी निर्माण केली आहे. यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना एन के.साळवे म्हणाले की नातेपुते गावाला जयंतीची चांगली परंपरा आहे.नातेपुते गाव हे तन मन धनाने सगळ्या कार्यक्रमात सहभागी असतात .घटना लिहीत असताना बाबासाहेबांनी प्रथम ३४१ वे कलम निर्माण करून ओबीसी ना हक्क दिले त्यानतंर ३४२ व्या कलमानुसार एससी एसटी.या घटकांना न्याय दिला.
यावेळी प्रमुख पाहुणे सहा.पोलिस निरीक्षक प्रवीण सपांगे बोलताना म्हणाले की बाबासाहेबांचे समस्त मानव जातीवर अनंत उपकार आहेत.आज मी या पदावर आहे ते केवळ बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकारामुळे. या अभिवादन सभेत बशीर काझी,रोहित सोरटे,विशाल सोरटे,विभागीय कृषी अधिकारी सुभाष साळवे,नगराध्यक्ष सौ उत्कर्षाराणी पलंगे,उप नगराध्यक्ष मालोजी देशमुख तसेच छोटा वक्ता विश्वरत्न प्रकाश साळवे यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी माजी सरपंच तथा नगरसेवक बी. वाय.राऊत,श्रावण सोरटे ,नगरसेवक अविनाश दोशी,आण्णा पांढरे,रणजीत पांढरे,तसेच रिपाईचे नेते युवराज वाघमारे,किशोर पलंगे,बाळासाहेब सोरटे, नवाज सोरटे,दादा लाळगे,रोहित शेटे,विनोद रणदिवे,संघर्ष सोरटे,बंटी सोरटे,अप्पासाहेब सोनवणे,सुभाष सोरटे,पांडुरंग सोरटे,राहुल भोसले,वैभव सोरटे, सिदनाक साळवे निलेश सोरटे आदी उपस्थित होते.
अभिवादन सभेत पी एचडी केल्याबद्दल
सिद्धार्थ सोरटे, सीएचओ पदी निवड झाल्याबद्दल प्रज्ञा सोरटे, जि.प. आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ.मंगल सोरटे या गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश सोरटे व सौरभ सोरटे ,प्रास्ताविक जयंती समिती सचिव बुद्धभुषण साळवे यांनी तर आभार समीर सोरटे यांनी व्यक्त केले.
जयंतीनिमित्त जि. प कन्या शाळेच्या वतीने वक्तृत्व,चित्रकला, रांगोळी,पोस्टर स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.यावेळी गट शिक्षण अधिकारी धनंजय देशमुख,केंद्र प्रमुख प्रशांत सरुडकर,मुख्याध्यापिका सुनंदा जाधव,छाया गोरे,दिपाली दहिवाळ व विद्यार्थि उपस्थित होते
१४ एप्रिल ला सायंकाळी भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत फटाक्यांच्या आतिषबाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले
आंबेडकर जयंती मिरवणुकीत मुस्लिम समाजाच्या वतीने वीस फुटी भव्य हार क्रेन च्या साहाय्याने हार घातला तसेच सर्वांना सरबत वाटप केले. होलार समाज संघटनेच्या वतीने बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले
0 Comments