Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव येथे पूर्ववैमनस्यातुन दिवसाढवळ्या खून , पाच जणावर गुन्हा दाखल एकास अटक, मागील दोन महिन्यापूर्वी झाले होते शेताच्या बांधावरून भांडण

धाराशिव येथे पूर्ववैमनस्यातुन  दिवसाढवळ्या खून , पाच जणावर गुन्हा दाखल एकास अटक, 
मागील दोन महिन्यापूर्वी झाले होते शेताच्या बांधावरून भांडण


धाराशिव:  शेतातील बांधाच्या वादातूनव पूर्व वैमान्यातून धारदार शस्त्राने वार करून खून केल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. धाराशिव येथे बुधवारी दि,(२६) दुपारी ३.३० वाजण्याच्या ही थरारक घटना घडली, मृत तरुण सांजा येथील रहिवासी असून या प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. मागील दोन महिन्यापासून मयताच्या कुटुंबीयांनी संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती मात्र आरोपीकडून पैसे घेऊन त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही त्यामुळे आरोपींचे आणखीन धाडस वाढले आणि त्यांनी आपल्या मुलाचा भर दिवसा खून केल्याचा आरोप मयत रामेश्वर किसन मोहिते यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की सांजा येथील रहिवासी रामेश्वर किसन मोहिते हा बुधवारी धाराशिव येथे कामासाठी आला होता काम करून तो दुपारी गावाकडे जात असताना सांजा चौकात ३ ते ४ जनानी शेतातील बांध व पूर्व वैमान्यातून हल्ला केला यावेळी तलवार व कत्तीचे वार करून रामेश्वर चे हातपाय तोडल्याने तो गंभीर जखमी जवळपास २० मिनिटे रक्ताच्या थारोळ्यात मयत रामेश्वर तडफडत पडला होता. मात्र मदतीला कोणी आली नाही घटनेनंतर मारेकरी पसार झाले घटनेची माहिती मिळतात माहित रामेश्वरचे वडील किसन मोहिते भाऊ पांडुरंग, सर्जेदार व आई घटनास्थळी दाखल झाले ,. यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच आनंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री पारेकर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

पोलिसांनी घटनास्थळावरून एक चाकू जप्त केला आहे,

शेतातील बांधाचा वाद व पूर्ववैमन्यातुन खूनाची घटना घडल्याची  प्राथमिक माहिती आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून रामेश्वरचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे घोषित केले. दरम्यान मृताच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयासमोर मोठा आकाश केला होता. या प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात ५ जणाविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे यापैकी एकास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची सांगितले या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments