Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्ह्यातील आठ बाजार समितीचे निवडले जाणार कारभारी, आज होणार मतदान उद्या फैसला|The stewards of eight market committees of the district will be elected

जिल्ह्यातील आठ बाजार समितीचे निवडले जाणार कारभारी, आज होणार मतदान उद्या फैसला! 

 


धाराशिव:  जिल्ह्यातील आठ कृषी उत्पन्न बाजार समिती साठी शुक्रवारी दि (२८) आज रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी , भाजप शिवसेना ( शिंदे गट) युतीच्या उमेदवारासह अपक्षाने प्रचाराचा धुराळा उडवून जोरदार तयारी केली आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका थेट शेतकऱ्यांशी संबंधित असल्यामुळे सर्वपक्षीय उमेदवार तसेच नेतेमंडळींनी या संस्था ताब्यात घेण्यासाठी प्रतिष्ठापना लावली आहे.

आगामी जिल्हा परिषदेचे रंगीत तालीम म्हणून बाजार समिती निवडणुकीकडे पाहिले जात आहे, परिणामी आतापासूनच आपला गड शाबूत राहावा यासाठी बड्या नेत्याकडून प्रयत्न केले जात आहेत. मागील आठ दिवसापासून प्रचाराचा धुराळा उडवत बुधवारी दुपारी प्रचाराची सांगता झालेली असून. गुरुवारी दिवसभर गुप्त पद्धतीने गाठीभेटी सुरू होत्या. या निवडणुकीत 327 उमेदवार नशीब आजमावत आहेत उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज  मतदाना तर उद्या फैसला  होणार आहे या निवडणुकीत महाआघाडीसह युतीच्या  नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे आठ बाजार समितीचे कारभारी कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Post a Comment

0 Comments