अणदुर येथील कृषी कार्यालय कायम कुलूप बंद अवस्थेत, कार्यालय असून अडचण नसून खोळंबा, शेतकऱ्यांची गैरसोय |
कुलुपबंद अवस्थेत असलेले अणदुर येथील कृषी कार्यालय |
अणदुर: तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथील कृषी कार्यालय सतत बंद अवस्थेत असल्याने, हे कृषी कार्यालय गावासाठी असून अडचण नसून खोळंबा असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. अनदुर हे परिसरातील मोठे गाव असल्याने येथे दर गुरुवारी आठवडी बाजार भरतो त्यामुळे येथे दहा ते पंधरा गावातील शेतकऱी कृषी कार्यामध्ये येत असतात.
शेतकऱ्यांना शेतीविषयक शासन स्तरावरील विविध योजना विषयक माहिती, जिल्हा परिषद ,पंचायत समिती, कृषी योजनांची सहज माहिती व्हावी या हेतूने गावोगावी कृषी कार्यालय काढण्यात आली आहे, मात्र तुळजापूर तालुक्यातील अनुदुर येथील कृषी कार्याला कायम कुलूप असते त्यामुळे येथील शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
येथील कृषी कार्यालय सोमवारी कामाचा दिवस असताना येथील कार्यालयास कुलूप बंद होते कोणताच कर्मचारी उपस्थित नव्हता शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी जाऊन शेती विषयक माहिती व लक्ष देता येत नाही म्हणून महाराष्ट्र शासनाने मंडळ कृषी कार्यालयाची निर्मिती करून गाव पातळीवर शेतकऱ्यांची सोय केली आहे. परंतु येथील कृषी कार्यालय कायम धुळखात कुलूप बंद अवस्थेत दिसत आहे, यामुळे या कृषी कार्याचा शेतकऱ्यांना फायदा व्हायचा सोडून या कार्यामुळे तोटाच होत असल्याचे दिसत आहे. खरीप हंगामातील पेरणीचा हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्यांवर कृषी अधिकारी व कर्मचारी शोधत फिरण्याची वेळ आली आहे़.
त्याचबरोबर कृषी विभागाकडून राबवण्यिात येत असलेल्या विविध योजना माहितच होत नसल्याने शेतकऱ्यांचा खोळंबा होत आहे.राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना खते, बियाणे, कृषी अवजारे आदी कृषी पुरक साधने उपलब्ध होत असतात. तसेच शेतकऱ्यांना वेळोवेळी कृषी विषयक मार्गदर्शन देण्याची व्यवस्था असते. शेतीची उत्पादकता वाढविण्याच्या उद्देशाने शासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात. मात्र अणदुर कृषी कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या गावातील शेतकरी या योजनापासून वंचित राहत आहेत.
अगोदर शेतकरी आसमानी संकटामुळे मेटाकुटीला आला आहे, त्यातच असे कृषी कार्यालय नेहमी बंद अवस्थेत असल्याने शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहे, येथील कृषी कार्यालय नेहमीच बंद असते, कधी उघडे असते तर कार्यालयामध्ये एकही कर्मचारी उपस्थित नसतो, ते नेहमी गैरहजर असतात त्यामुळे शेतकऱ्यांना आपली शेतीचे कामे सोडून कृषी कार्यालयकडे वारंवार हेलपाटे मारत आहेत़. याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने लक्ष देऊन हे कार्यालय नियमित सुरळीत चालू ठेवण्यात यावे अशी मागणी शेतकरी बांधवातून होत आहे.
0 Comments